MP Bus Accident : एसटीच्या भीषण अपघातातील १३ पैकी ८ मृतदेहाची ओळख पटली

जळगाव
Updated Jul 18, 2022 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Out of 13 bodies, 8 bodies were identified: चालक चंद्रकांत पाटील आणि वाहक प्रकाश श्रावण चौधरी हे बस घेऊन येत होते. पुलाचा कठडा तोडून एसटी नर्मदा नदीत कोसळली. तांत्रिक बिघाडामुळे एसटी पुलावरून कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. अपघातग्रस्त एसटी बस अमळनेर आगाराची असल्याचं समजतंय. तसंच इंदूरहून अमळनेरकडे जात असताना हा अपघाता झाला आहे.

Out of 13 bodies, 8 bodies were identified
भीषण अपघातातील १३ पैकी ८ मृतदेहाची ओळख पटली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळली
  • दुर्घटनेत एसटीच्या चालक आणि वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला
  • महाराष्ट्राकडे जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावरून २५ फूट खाली नदीत पडली

MP Bus Accident : जळगाव : मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत (Narmada River)  कोसळली. या दुर्घटनेत एसटीच्या चालक आणि वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला आहे. या बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. सकाळी १० वाजता हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी येथील नर्मदा नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळली. तसंच मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची बस इंदोर-अमळनेर ही बस (एम.एच.४० ओ एन.९८४८) आज सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास इंदौर येथून अमळनेरकडे येण्यासाठी निघाली. मात्र, रस्त्यात हा अपघात घडला आणि यामध्ये तब्बल १३ जणांनी आपला जीव गमावला आहे. तर १५ जणांचा सुखरूप बाहेर काढलं आहे.

अधिक वाचा ; अमरावतीत भीषण अपघात..! दोन वाहनांच्या धडकेत 6 जण जागीच ठार

महाराष्ट्राकडे जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावरून २५ फूट खाली नदीत पडली

चालक चंद्रकांत पाटील आणि वाहक प्रकाश श्रावण चौधरी हे बस घेऊन येत होते. पुलाचा कठडा तोडून एसटी नर्मदा नदीत कोसळली. तांत्रिक बिघाडामुळे एसटी पुलावरून कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. अपघातग्रस्त एसटी बस अमळनेर आगाराची असल्याचं समजतंय. तसंच इंदूरहून अमळनेरकडे जात असताना हा अपघाता झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इंदूरहून महाराष्ट्राकडे जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावरून २५ फूट खाली नदीत पडली. धामनोद पोलीस आणि खलटाका पोलीस घटनास्थळी बचावकार्य राबवत आहेत. NDRF ची टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. इंदूरचे आयुक्त पवन कुमार शर्मा यांनी धार आणि खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिक वाचा : झेलेन्सकींचा SPYचीफ मित्र निघाला गद्दार, रशियाला केली मदत 

मृतांमध्ये या व्यक्तीचा आहे समावेश?

सदर दुर्घटनेत बसचालक आणि वाहकाचाही समावेश आहे. चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (वय ४५, राहणार अमळनेर , जळगाव), वाहक प्रकाश श्रावण चौधरी (वय ४०, रा. शारदा कॉलनी, अमळनेर जळगाव) अशी या दोघांची नावे आहेत. निंबाजी आनंदा पाटील (वय ६०, रा. पिळोदा ता. अमळनेर) कमला निंबाजी पाटील (वय ५५, रा पिलोदा ता. अमळनेर), आणि अशी जळगाव जिल्ह्यातील चारही मृतांची नावे आहेत. तर मूर्तिजापूर, अकोला येथील अरवा मुर्तजा बोरा (वय २७) यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे.

अधिक वाचा : भीषण अपघात; एसटी बस पुलावरून कोसळली, 13 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी