MSEDCL : महावितरणच्या  सहाय्यक अभियंत्याला मारहाण

जळगाव
रोहन जुवेकर
Updated Dec 25, 2021 | 00:41 IST

MSEDCL Assistant Engineer beaten : जळगाव शहरात सिंधी कॉलनी परिसरात धक्कादायक प्रकार घडला. महावितरणच्या पथकावर हल्ला झाला. शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

MSEDCL Assistant Engineer beaten in Jalgaon
MSEDCL : महावितरणच्या  सहाय्यक अभियंत्याला मारहाण 
थोडं पण कामाचं
  • MSEDCL : महावितरणच्या  सहाय्यक अभियंत्याला मारहाण
  • शिवीगाळ व मारहाण करण्यात आली
  • शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल

MSEDCL Assistant Engineer beaten : जळगाव : जळगाव शहरात सिंधी कॉलनी परिसरात धक्कादायक प्रकार घडला. थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेले महावितरणचे (Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL / Maharashtra State Electricity Distribution Company Limited) सहाय्यक अभियंता जयेश रजनीकांत तिवारी यांच्यासह त्यांच्या पथकाला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

थकीत वीज बिल ग्राहक किशोर टिकमदास पोपटानी याने थेट सहाय्यक अभियंता जयेश तिवारी यांच्या डोक्यात कुदळ घालण्याचा व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत किशोर पोपटानी याच्या हातातील कुदळ घेतल्याने अनर्थ टळला. नंतर किशोर पोपटानी याने पथकावर दगडफेक केली. दगडफेकीत महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला.

किशोर टिकमदास पोपटानी याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोपटानी याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोपटानीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी