Nawab Malik arrested: मलिक यांच्यावरील कारवाईबाबत न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव
भरत जाधव
Updated Feb 24, 2022 | 13:29 IST

Public Prosecutor Ujjwal Nikam on Malik Arrest : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) तथा अल्पसंख्याक मंत्री (Minister of Minorities) नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून बुधवारी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Public Prosecutor Ujjwal Nikam
काही निष्पन्न असेल म्हणूनच अटक पण...: अँड. निकम   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अटक कायदेशीर की बेकायदेशीर हेसुद्धा न्यायालयातच होणार स्पष्ट
  • प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतरच मलिकांना अटक
  • दाऊद इब्राहीमच भाऊ इक्बाल कासकार याच्या जबानीत नवाब मलिक यांचे नाव

Public Prosecutor  Ujjwal Nikam on Malik Arrest :  जळगाव:: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) तथा अल्पसंख्याक मंत्री (Minister of Minorities) नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून बुधवारी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र ईडीने (ED) प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना अटक केली असून त्यांची ही अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय (Court) काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी दिली आहे. ते जळगावात (Jalgaon) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निकम यांनी मलिक यांच्या अटकेनंतरच्या न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल याबाबतही माहिती दिली. 

मलिक यांच्याविरोधात ईडीने सकृतदर्शनी पुरावा गोळा केला आहे. तो सबळ आहे का? तसेच मलिक यांच्याकडून काही बाबींवर समाधानकारक खुलासा न आल्याने याच्या आधारावर मलिक यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून होऊ शकते. तसेच कुठलाच पुरावा नसताना मलिक यांच्यावर कारवाई केल्याबाबत तसेच थेट तसा पुरावा नसतानाही राजकीय खेळीतून ही कारवाई केल्याचं मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयात सिद्ध करण्यात आले. तर न्यायालयीन कोठडी मागतील व त्यानंतर मलिक यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 

प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टच्या कलम ५० नुसार प्रथम समन्स पाठवावा लागतो. नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो. यानुसार ईडीने कारवाई केली आहे का? सबळ पुरावा असला तरच ईडी अटक करते. त्यामुळे ज्या पुराव्याच्या आधारावर मलिक यांना अटक झाली तो पुरावा किती सबळ आहे. हे न्यायालयात स्पष्ट होईल. सध्या ही कारवाई कायदेशीर व बेकायदेशीर अशा चर्चा रंगत असल्या तरी न्यायालय काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे असल्याचेही यावेळी ऑड निकम म्हणाले.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. दाऊद इब्राहीमच भाऊ इक्बाल कासकार याच्या जबानीत नवाब मलिक यांचे नाव समोर आले होते. मलिक यांनी गुन्हेगारांकडून जमिनी खरेदी केल्या आहेत असा आरोप करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी