शिवसेनेचा नाथा भाऊंना पुन्हा दे धक्का; राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन

जळगाव
भरत जाधव
Updated Feb 21, 2022 | 10:47 IST

राष्ट्रवादीचे (NCP) दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा धक्का बसला आहे. हा धक्का राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसनेने (Shivsena) दिला आहे. जळगावातील मुक्ताईनगरच्या (Muktainagar Jalgaon) स्थानिक आमदार (MLA) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ) यांनी तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या तरुण शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे.

NCP Worker join Shivsena in Muktainagar
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चंद्रकांत निंबा पाटील हे शिवसेनेचा जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत.
  • बोदवड नगरपंचायतीमध्ये एकनाथ खडसे यांना चंद्रकांत पाटील यांनी हादरा दिला होता.
  • बोदवड नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली.

मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे (NCP) दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा धक्का बसला आहे. हा धक्का राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसनेने (Shivsena) दिला आहे. जळगावातील मुक्ताईनगरच्या (Muktainagar Jalgaon) स्थानिक आमदार (MLA) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ) यांनी तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या तरुण शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. चंद्रकांत निंबा पाटील हे शिवसेनेचा जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

याआधी बोदवड नगरपंचायतीमध्ये एकनाथ खडसे यांना चंद्रकांत पाटील यांनी हादरा दिला होता. त्यापाठोपाठ हा खडसेंना दुसरा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत एकनाथ खडसेंचे वाकयुद्ध रंगले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी नांदत असली, तरी जळगावात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष जोरदार होताना दिसत आहे.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. शुक्रवारी या नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदाची माळ आनंद रामदास पाटील यांच्या गळ्यात पडली, तर उपनगराध्यक्षपदी रेखा संजय गायकवाड यांची निवड झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेला साथ दिली. 

नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बोदवडकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे तो विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवणार आहे. बोदवडच्या विकासासाठीच भाजप शिवसेनेसोबत आली आहे. जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये भाजप सेना सोबत राहील का? याबाबत विचारले असता त्यांनी भाजपचे भाजपला विचारा, ते तयार असतील तर आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले होते. 

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला पराभवाची धूळ

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. अत्यत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला धूळ चारत शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी