Gulabrao Patil: 'लोकं सरपंच पदाची खुर्ची सोडत नाही आम्ही तर मंत्रिपदं सोडली', गुलाबराव आले फॉर्मात

जळगाव
रोहित गोळे
Updated Jul 06, 2022 | 15:53 IST

बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. आम्ही शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केला.

people are not leaving the sarpanch post we are leaving the ministerial post gulabrao patil criticism on shiv sena leadership
'आम्ही तर मंत्रिपद सोडलं;, गुलाबराव आले फॉर्मात   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • मंत्रिपदं सोडून उठाव केल्याचा गुलाबराव पाटलांचा दावा
  • सत्ता स्थापन होताच गुलाबरावांनी प्रत्युत्तर देण्यास केली सुरुवात
  • गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर देखील केली टीका

जळगाव: राज्यात शिंदे सरकार (Shinde Govt) अस्तित्वात आल्यानंतर आता शिवसेनेचे (ShivSena) बंडखोर आमदार हे फुल फॉर्मात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेले १५ दिवस या आमदारांवर सातत्याने टीका होत होती. मात्र, आता टीकाकारांना उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारही पुढे सरसावले आहेत. याच बंडखोर आमदारांपैकी एक असलेले माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे पुन्हा एकदा आपल्या स्टाईलमध्ये शिवसेना नेतृत्वावर टीका करताना पाहायला मिळाले.

'लोकं सरपंच पदाची खुर्ची सोडत नाही आम्ही तर मंत्रिपदं सोडून बाहेर पडलो आहोत. आम्ही आठ मंत्र्यांनी आमची मंत्रिपदं सोडली आहेत. मी कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री असताना माझं पद सोडलं आहे. हे काही सहज होत नाही. सत्तेकडे आम्ही गेलो असतो आणि सत्तेच्या लालसेने गेलो असतो तर आम्ही गद्दार असतो.' असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते जळगावात माध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील पुन्हा आले फॉर्मात 

एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला काही आमदार फोडल्यानंतर ते सुरवातीला सूरतला निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून थेट सर्व आमदारांना गुवाहटीला नेलं. या मधल्या काळात मंत्री गुलाबराव पाटील हे मुंबईतच होते. मात्र, काही दिवसानंतर अचानक ते गुवाहटीला गेले. त्यानंतर ते देखील कट्टर शिवसैनिकांच्या रडारवर आले. त्यांच्यावर तुफान टीका केली गेली. मात्र, सत्ता स्थापन होईपर्यंत त्यांनी टीकाकारांना फारसं उत्तर दिलं नाही. मात्र, आता गुलाबराव पाटील हे पुन्हा फॉर्मात आले असून आपल्या पहिल्याच्याच आक्रमक शैलीत टीकाकारांना उत्तर देणं सुरु केलं आहे. पाहा गुलाबराव पाटील नेमकं काय-काय म्हणाले. 

'आम्ही आठ मंत्र्यांनी आमची मंत्रिपदं सोडली'

'आम्ही आठ मंत्र्यांनी आमची मंत्रिपदं सोडली आहेत. मी कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री असताना माझं पद सोडलं आहे. हे काही सहज होत नाही. सत्तेकडे आम्ही गेलो असतो आणि सत्तेच्या लालसेने गेलो असतो तर आम्ही गद्दार असतो. आम्ही उठाव केला आहे उठाव... त्या उठावामुळेच आम्ही बाहेर निघालो.' असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

अधिक वाचा: Shiv Sena: 'या' व्यक्तीमुळेच शिवसेना फुटली', बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा सरळसरळ आरोप

'लोकं सरपंच पदाची खुर्ची सोडत नाही आम्ही तर..'

'आम्ही सत्तेकरिता बाहेर पडलेलो नाही. सत्ता सोडून बाहेर पडलो आहे. लोकं सरपंच पदाची खुर्ची सोडत नाही आम्ही तर मंत्रिपदं सोडून बाहेर पडलो आहोत. एक नाही तर आठ मंत्री. याचा अर्थ काय होतो की.. आम्हाला आमचा शिवसेना पक्ष वाचवायचा आहे.' असा दावाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला आहे.  

'संजय राऊतांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी...'

'शिवसेना पक्ष संपेल अशी आम्हाला भीती वाटत होती. तो शिवसेना पक्ष वाचविण्याकरिता आम्ही सगळ्यांनी हा उठाव केलेला आहे. संजय राऊत यांना उत्तर द्यायची मला काहीही गरज नाही. ते जे खासदार म्हणून बसले आहेत त्यामध्ये आमचंही एक मत आहे. त्यामुळे त्यांनी त्या मताची किंमत ठेवावी एवढीच काय ती विनंती.' असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. 

मंत्रिपद तर मिळणारच आहे!

'मंत्रिपद तर मिळणारच आहे. ते सहाजिकच आहे. ते मिळेलच. माझ्यावर शिंदे साहेब जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी स्वीकारेन.' असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी