पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींनी उडवली शरद पवारांची खिल्ली

जळगाव
पूजा विचारे
Updated Oct 13, 2019 | 18:52 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आहेत. पंतप्रधान मोदींची पहिली सभा जळगावात झाली. यावेळी मोदींनी शरद पवार यांचा एका सभेतील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा उल्लेख करत खिल्ली उडवली.

M Modi- Sharad Pawar  (Photo Credit: BCCL and PTI)
पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींनी उडवली शरद पवारांची खिल्ली 

थोडं पण कामाचं

  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत.
  • पंतप्रधान मोदींची पहिली सभा जळगावात झाली.
  • . यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एका सभेतील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा उल्लेख करत खिल्ली उडवली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत. पंतप्रधान मोदींची पहिली सभा जळगावात झाली. यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एका सभेतील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा उल्लेख करत खिल्ली उडवली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून मोदींनी खुमासदार शैलीत टीका केली. 

आमच्या व्यासपीठावर युवा नेते आहेत. आम्ही आताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला. त्यात शरद पवार सोफ्यावर बसले होते. त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे नेते बसले होते. त्यांना तीन ते चार जणांनी हात देऊन उभं केलं. त्यांना हार पुष्पहार घातला. त्यावेळी फोटो काढताना एका युवकानं त्यात मान घातली. शरद पवार हे एवढे मोठे नेते आहे की, आयुष्यभर पेपरमध्ये त्यांचे फोटो छापले. टीव्हीमध्ये झळकले. त्यांना मोठा मान- सन्मान आहे. या इतक्या मोठ्या नेत्याचं मन इतकं लहान आहे की त्यांनी त्या युवा नेत्याच्या डोक्यावर कोपरा मारला आणि त्याला बाजूला केलं, असं म्हणत मोदींनी पवारांची अॅक्शन करून दाखवली.  पुढे मोदी म्हणाले की, आपल्या युवा कार्यकर्त्यांना जे सोबत घेऊन जात नाही, ते राज्याला काय पुढे घेऊन जाणार अशी टीका त्यांनी केली. 

निवडणुकीसाठी पवारांच्या सध्या राज्यभर दौऱ्या सुरू आहे. याचदरम्यान पवारांचा दौऱ्यादरम्यानचा एक कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील वडेगावमध्ये पवार प्रचारासाठी गेले होते. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. मोदींनी आज त्या व्हिडिओचा उल्लेख करत पवारांची नक्कल केली. 

जळगावात मोदींची पहिली प्रचारसभा 

कसं काय आहे जळगाव? म्हणत मोदींनी जळगावमधील भाषणाला  मराठीतून सुरूवात केली. तसंच महाजनादेश देणार का? पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना मराठीत प्रश्न विचारला.  जम्मू-काश्मीर आपल्यासाठी केवळ जमीनीचा तुकडा नाहीय तर भारताचं मस्तक आहे. ४० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये जी असामान्य परिस्थिती होती ती परिस्थिती सामान्य करण्यासाठी चार महिने सुद्धा लागणार नाही. पण काही राजकीय पक्ष, नेते या निर्णयावर राजकारण करत असल्याचं मोदींनी म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी