[VIDEO] जम्मू-काश्मीर केवळ जमीन नाही तर भारताचं मस्तक: मोदी

जळगाव
सुनिल देसले
Updated Oct 13, 2019 | 12:26 IST

PM Narendra Modi Rally: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रात जाहीर सभा पार पडली आहे. मोदींची जळगावातील संपूर्ण सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Narendra Modi rally in Jalgaon
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावात जाहीर सभा LIVE  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

 • विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
 • पंतप्रधान मोदींची जळगावात जाहीर सभा
 • मोदींची दुसरी सभा भंडाऱ्यातील साकोली येथे

जळगाव: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी खूपच महत्वाचा आहे. रविवारचा मुहूर्त साधत राजकीय पक्षांनी आपल्या विविध ठिकाणी मोठ्या प्रचारसभांचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगाव आणि भंडाऱ्यात जाहीर सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमधील जाहीर सभेत संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केलं.

पंतप्रधान मोदींच्या सभेचा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील महत्वाचे मुद्दे

 1. प्रत्येकाच्या घराचं स्वप्न २०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत
 2. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भाषा ही आपल्या शेजारच्या देशाप्रमाणे
 3. पण काही राजकीय पक्ष, नेते या निर्णयावर राजकारण करत आहेत
 4. ४० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये जी असामान्य परिस्थिती होती ती परिस्थिती सामान्य करण्यासाठी चार महिने सुद्धा लागणार नाही 
 5. जम्मू-काश्मीर आपल्यासाठी केवळ जमीनीचा तुकडा नाहीये तर भारताचं मस्तक आहे
 6. ५ ऑगस्ट रोजी एनडीए सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला
 7. जगभरातील इतर देश भारतासोबत मैत्री करण्यास उत्सुक आहेत
 8. जगभरात भारतीय लोकशाहीचा गौरव होत आहे
 9. लोकसभा निवडणुकीत महिलांनी मतदान करुन पुरुषांसोबत बरोबरी केली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन पण आता विधानसभा निवडणुकीत पुरुषांच्याही पुढे जाऊन मतदान करायला हवं
 10. लोकसभा निवडणुकी दरम्यान महिलांनी विक्रमी मतदान केलं
 11. चार महिन्यांपूर्वी तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार
 12. एनडीएवर तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार
 13. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वात महायुतीला सत्तेत आणण्यासाठी तुमच्या सर्वांचं समर्थन मागण्यासाठी आलोय
 14. महाजनादेश देणार का? पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारला मराठीत प्रश्न
 15. मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून
 16. कसं काय आहे जळगाव? म्हणत मोदींनी केली भाषणाला सुरुवात
 17. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात
 18. शरद पवारांच्या पक्षात कोणीही रहायला तयार नाहीये
 19. कोण खरा पैलवान हे निवडणुकीत जनताच दाखवेल
 20. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला
 21. कार्यकर्ते महाराष्ट्रात आणि नेते बँकॉकला
 22. राहुल गांधी आहेत कुठे?
 23. मुख्ममंंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका
 24. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात
 25. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन 

प्रचारासाठी आजचा दिवस सुपरसंडे ठरणार आहे. आज सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या मोठ्या प्रचारसभा, रॅलीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यभरातील विविध ठिकाणी जाहीर प्रचारसभा होणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी