Road Accident : जामनेरमध्ये रिक्षा-ट्रकचा भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू, 16 जण जखमी 3 जणांची अवस्था चिंताजनक

जळगाव
भरत जाधव
Updated Dec 21, 2021 | 13:50 IST

Accident : जळगाव (Jalgaon) मधील जामनेर(Jamner) येथे सकाळी अपे रिक्षा (Rickshaw) आणि ट्रक (Truck) यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत.

Road Accident
जामनेरमध्ये रिक्षा-ट्रकचा भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जामनेर गारखेडा या रस्त्यावरील बेदमुथा जिनिंग फॅक्टरीजवळ अपघात
  • 4 जणांचा जागीच मृत्यू
  • स्थानिक आमदार गिरीश महाजन दोन रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळावर हजर

Rickshaw- Truck Accident : जळगाव (Jalgaon) मधील जामनेर(Jamner) येथे सकाळी अपे रिक्षा (Rickshaw) आणि ट्रक (Truck) यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत, यापैकी 3 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात जामनेर गारखेडा या रस्त्यावरील बेदमुथा जिनिंग फॅक्टरीजवळ घडला.

भुसावळ येथून रेल्वेने विविध ठिकाणाहून आलेल्या प्रवाशांना पियाजिओ रिक्षा जामनेरच्या दिशेने घेऊन जात होती. या रिक्षात किमान 16 प्रवासी बसले होते. रिक्षाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच जामनेरकडून लाकडांनी भरलेल्या ट्रकने रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात होताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार गिरीश महाजन दोन रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. हा अपघात सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडला. सर्व जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दुर्दैव म्हणजे, या रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले त्यावेळी येथील 7 पैकी एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. फोन केल्यानंतर 2 डॉक्टर पोहोचले. यानंतर गंभीर जखमींना उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी