Ajit Pawar एवढे कधीच संतापले नव्हते, पाहा अजितदादा एवढे का चिडले!

जळगाव
रोहित गोळे
Updated Sep 15, 2022 | 15:40 IST

Ajit Pawar Angry: वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधून गेल्याने अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं आहे.

see ajit pawar was why got so angry jalgaon speech ncp bjp vedanta project maharashtra gujarat
Ajit Pawar एवढे कधीच संतापले नव्हते, पाहा अजितदादा एवढे का चिडले!   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने अजित पवार चिडले
  • अजित पवारांनी जळगावमधील भाषणात सराकरवर केली तुफान टीका
  • अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर शाब्दिक प्रहार

Vedanta: जळगाव: महाराष्ट्रात (Maharashtra) येऊ घालणारा वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) गेल्याने विरोधक हे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadnavis Govt) प्रचंड रान उठवत आहे. यातच आता विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे तर खूपच संतापले आहेत. जळगावमधील (jalgaon) एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अजित पवार हे पहिल्यांदाचा एवढे चिडलेले दिसले. पाहा जळगावमधील कार्यक्रमात अजित पवारांनी नेमकी टीका काय केली. (see ajit pawar was why got so angry jalgaon speech ncp bjp vedanta project maharashtra gujarat)

अजित पवारांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे:

'दबावाखाली वेदांता प्रोजेक्ट गुजरातला गेला'

'राज्यात 2 लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. दीड लाख वेदांता आणि फॉक्सकॉन यांच्या माध्यमातून होणार होती. तर 50 हजार कोटींची गुंतवणूक ही यांच्याशी संबंधित छोट्या उद्योगातून होणार होती. चार राज्यात ही कंपनी सर्व्हे करत होती. त्यात महाराष्ट्रात सर्व सोयीयुक्त तळेगाव येथील 1000 एकर जागेची ऑफर वेदांता कंपनीला दिली होती. त्यांनी जवळपास मानसिकता तयार केली होती महाराष्ट्रात येण्याची. यातून दीड लाख मुला-मुलींना रोजगार मिळणार होता.' 

अधिक वाचा: 'वेदांता'वरुन एकनाथ खडसेंची भाजपवर तुफान टीका

'आज आम्ही त्यात राजकारण न करता मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, यात वेळीच लक्ष घाला. आता जी गुजरातमधील जागा निवडली गेली आहे ती दबावाखाली निवडण्यात आली आहे. असं समजतं आहे. मग का मुख्यमंत्री बोलत नाहीत. का महाराष्ट्राचा आवाज दाखवत नाहीत?' असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला. 
 
'तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करता काय?'

'आता काय टूम काढलीय.. तर हा प्रकल्प गेला तर त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू. अरे मोठा प्रकल्प तर आणाच.. मोठा आणू काय आणू? परंतू हा का जाऊ देता? तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करता काय? आम्हाला काय कळत नाही का राजकारण? हे जे काही चाललं आहे त्यात माझा राजकीय स्वार्थ काही नाही.' असं म्हणत अजित पवार आपला संताप व्यक्त केला.  

'कुठं बटण दाबायचं, कोणाची बनवाबनवी करायची हे जनतेला चांगलं समजतं'

'आज राज्याचं जे नुकसान होतंय त्याला जबाबदार कोण? कोरोनाचं संकट असताना देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही राज्याची आर्थिक घडी विस्कटू दिली नाही. कॅगने देखील त्याचं कौतुक केलं. थोडीशी आमची वागणूक किंवा पद्धत कडक असेल. पण आम्ही आर्थिक शिस्त लावली.' 

अधिक वाचा: महाराष्ट्राला बसणार आणखी एक धक्का, वेदांतानंतर आणखी एक कंपनी राज्याबाहेर जाणार?

'रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प देखील दुसऱ्या राज्यात जाणार असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. त्यातून देखील 80 हजार तरुण-तरुणींना काम मिळणार होतं. आता काय सांगतायेत. याला जोडून दुसरा प्रकल्प देणार. अरे हाच प्रकल्प द्या आधी. जोडून द्यायचाय तर तिकडे द्या ना त्यांना. पण ही जी काही बनवाबनवी चालली आहे.. लोकं शांत बसतात परंतु वेळ आली की, कुठं बटण दाबायचं आणि कोणाची बनवाबनवी करायची हे जनतेला चांगलं समजतं.' असं म्हणत अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 

'आम्ही काय वरनं पडलो होतो काय?'

'माझं एवढंच म्हणणं आहे की, शिंदे साहेब तुम्ही सगळ्यांना सांगता सर्वसामान्यांचं सरकार.. आमचं सरकार होतं तेव्हा सर्वसामान्यांचं सरकार नव्हतं काय? आम्ही काय वरनं पडलो होतो काय? तुम्हीही आमच्या मांडीला मांडी लावून बसत होता ना.' असं संतप्त वक्तव्य देखील यावेळी अजित पवार यांनी केलं आहे. 

अधिक वाचा: Sudhir Mungatiwar : राज्यातील गुंतवणुकीवर महाविकास आघाडीचे नेते उदासीन होते, भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांची टीका

'गद्दार म्हटलं की, यांचे धाबे दणाणतात...'

'गद्दार म्हटलं की, यांचे धाबे दणाणतात... जर तुम्ही गद्दार नाही तर तुम्हाला लागायचं कारण काय? ज्याने कोणी गद्दारी केली असेल त्यालाच लागेल ना. आम्ही कोणाचं नाव घेतोय का? शिवाजी महाराजांच्या राज्यात गद्दारी चालणार नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.' असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदारांना डिवचलं आहे. 

'दोघंच बरे होते तर कशाला 18 मंत्री कशाला घेतले?'

'एक तर ही दोघंच सरकार चालवत होते किती तरी दिवस.. आम्ही दोघंच बरे आहोत... म्हणत होते. अरे दोघंच बरे होते तर कशाला 18 घेतले? त्यांना भीती वाटते की, सगळे 43 भरले की, दुसऱ्याला जे गाजर दाखवलंय ना.. तुला घेतो, तुला घेतो.. ते उघडं पडल्यावर याच्यापाशी जाईल का परत उद्धव ठाकरेंपाशी याची खात्री नाही यांना.' असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी