एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...

जळगाव
पूजा विचारे
Updated Oct 17, 2019 | 12:33 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. खडसेंच्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीनं विरोधी पक्षनेते पदाचीऑफर देण्यात आली होती, असं खडसे म्हणालेत.

Eknath khadse
राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...: खडसे  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
  • खडसेंच्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ माजली आहे.
  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. खडसेंच्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ माजली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. एवढ्या वरच खडसे थांबले नाहीत तर पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आले होते. भुसावळमधील भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. 

गेल्या काही वर्षांमध्ये माझ्यावर अन्याय झाला. परंतु आपला जन्म चांगल्या संस्कृतीत झाला आहे. जनतेची जोवर साथ मिळत आहे. तोवर मी उभा राहिन. भाजपनं मला राज्यात ओळख मिळवून दिली. ज्या पक्षानं मला मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं. त्यांच्यामुळेच मी 6 वेळा आमदार, विरोधीपक्ष नेता, गटनेतेपद आणि 12 खात्यांचं मंत्रीपदही मिळालं. अशा पक्षाला मी मधूनच सोडणं योग्य नाही. ते माझ्या मनाला न पटणारं होतं, असं एकनाथ खडसे म्हणाले.

पुढे एकनाथ खडसे म्हणाले की, एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आपला उमेदवार माघारी घ्यावा लागून एका अपक्षाला पाठिंबा द्यावा लागतो. त्यावरून मुक्ताई नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे, हे यावरून लक्षात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादीवाले माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली. मात्र अखेर राष्ट्रवादीस शिवसेनेकडून उसनवार घेतलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला आणि त्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यांनी अद्याप शिवसेना सोडली नसून पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला नाही अशी टीका खडसेंनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे तीन दिवस राहिलेत. उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच भाजपनं एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याआधी खडसेंच्या उमेदवारीवरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. शेवटच्या उमेदवारी यादीपर्यंत त्यांचं नाव नव्हतं. त्यानंतर भाजपच्या शेवटच्या यादीत रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी