'भाजपचे दहशवाद्यांशी संबंध', एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ

serious allegations that bjp links with terrorists - ekanath khadse : दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी आहे. तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी काही विशिष्ट लोकांसोबत एकत्र बसून जेवण केल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

serious allegations that bjp links with terrorists - ekanath khadse
'भाजपचे दहशवाद्यांशी सबंध' , खडसेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी
  • आरक्षणासंदर्भात ओबीसींना त्यांचा वाटा मिळायलाच पाहिजे – एकनाथ खडसे
  • दुर्दैवाने राज्य सरकार कमी पडले – खडसे

जळगाव : भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी मंत्री तथा सध्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यानी केलेल्या या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी आहे. तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी काही विशिष्ट लोकांसोबत एकत्र बसून जेवण केल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे, विरोधकांच्या हाती सरकारला घेरण्यासाठी आयता मुद्दा मिळाला असून, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात घडणाऱ्या या सध्याच्या विविध घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा : Intermittent Fasting: भरपेट जेवूनही तुम्ही घटवू शकता वजन

खडसे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले, नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?

गदारोळामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण संपवावा लागलं. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते केले असते. राज्यपाल आपल्या अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची ही घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात घडली असून, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अर्वाच्य घोषणा दिल्याची बातमी समोर आली. मात्र माझ्या मते दोन्ही बाजूने घोषणा प्रति घोषणा झाल्या.  असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

अधिक वाचा : भारताचा माजी वेगवान गोलंदाज BCCIच्या सरव्यवस्थापक पदी

आरक्षणासंदर्भात ओबीसींना त्यांचा वाटा मिळायलाच पाहिजे – एकनाथ खडसे

दरम्यान, पुढे बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे. मात्र अजूनही याचा सखोलपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आरक्षणासंदर्भात ओबीसींना त्यांचा वाटा मिळायलाच पाहिजे. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. "सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये", अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

अधिक वाचा : स्थानिक निवडणूक होणार २७ टक्के ओबीसी आरक्षणाशिवाय

दुर्दैवाने राज्य सरकार कमी पडले – खडसे

दुर्दैवाने राज्य सरकार कमी पडले असून केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा राज्य सरकारला दिला असता तर तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी जी कसरत करावी लागली ती करावी लागली नसती. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी