पाच महिन्यांपासून सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार, सहा जणांना अटक

जळगाव
भरत जाधव
Updated May 15, 2022 | 20:27 IST

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon district) एक संतापजनक घटना घडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचं गावातील तीन तरुणांनी गेल्या 5 महिन्यांपासून लैंगिक शोषण(Sexual abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 Seventh class student for five months, six accused  arrested
पाच महिन्यांपासून सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • घटनेतील 3 आरोपींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य चौघांना अटक
  • जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेशवर पोलीस ठाण्यात तक्रार

sexually abusing a girl :  जळगाव :  जळगाव जिल्ह्यात (Jalgaon district) एक संतापजनक घटना घडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचं गावातील तीन तरुणांनी गेल्या 5 महिन्यांपासून लैंगिक शोषण(Sexual abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. या घटनेतील 3 आरोपींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीची गावातील एका तरुणासोबत ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत या तरुणाने मुलीला गावाबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार करणं सुरूच ठेवलं. या घटनेबाबत आरोपी तरुणाने इतर दोन मित्रांना सुद्धा या प्रकारची माहिती दिली. तरुणाने त्याच्या मित्रांना माहिती दिल्यानंतर ते तरुणही त्याच्यावर नजर ठेऊन होते.

या दोघांनी मुलीला धमकी देण्यास सुरुवात केली. गावात याबद्दल सांगू अशी धमकी देत या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या पाच महिन्यांपासून हे तिघेही तरुण या मुलीवर वारंवार अत्याचार करत होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता मुलगी घराच्या बाहेरून अचानक गायब झाली आणि रात्री उशिरा घरी परतल्यानंतर आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारले असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. मुलीवर बेतललेल्या या प्रसंगानंतर आई-वडिलांनी आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेशवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखले केली आहेत. या घटनेत पीडितने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीवर अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो, अॅट्रो सिटी आणि बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी