Mahajan-Gulabrao Patil Meeting : जळगाव : राज्यात नगरपंचायत (Nagar Panchayat ) निवडणुकीच्या (election) निमित्ताने पुन्हा एकदा महाविकासआघाडी आणि भाजपा (BJP) यांच्यात लढत पहायला मिळाली. निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळाले. दुसरीकडे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादीने (NCP) आघाडीवर राहिली. तर शिवसेना (Shiv Sena) चौथ्या स्थानावर फेकली गेली. सगळ्या महत्त्वाची ठरलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा राहिली ती जळगावमधील (Jalgaon) बोदवड नगरपंचायतीची, कारण याला लागली होती सेना भाजपच्या छुप्प्या युतीची फोडणी. छुप्प्या युतीची चर्चा असतानाच आता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे सगळ्याच्या भुवया उंचावल्या आहेत.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीची राज्यात सर्वाधिक चर्चा रंगली. बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, शिवसेनेला समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पराभवाचा धक्का बसला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. परंतु या निवडणुकीचा परिणाम राज्यातील इतर भागावार पडणार असं म्हटलं जात आहे.
कारण नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअगोदर जळगावचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात भेट होऊन चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा जळगावच्या राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चा रंगल्या आहेत. जळगाव जामनेरात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकाच गाडीमध्ये बसत चर्चा केली. तर बुधवारी विशेषत: जामनेरमध्ये एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील गेले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.
गिरीश महाजन हे विविध मुद्यावर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी काही कार्यकर्ते महाजन यांच्या घरी पोहोचले होते. आज होणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनात गुलाबराव पाटील यांना बोलवायचं का? असा सवाल गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केला. गिरीश महाजन यांनी हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
एकनाथ खडसे यांनी नगरपंचायतीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आणि भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. “एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचं चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.
बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काही म्हणायचे ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये ते हरले आता कारण कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची, असा प्रकार खडसे यांचा सुरू असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.