जळगावमध्ये उद्धव ठाकरे समर्थक महापौरांच्या घरावर दगडफेक, गणपती विसर्जन मिरवणुकीला हिंसक वळण

जळगाव
रोहन जुवेकर
Updated Sep 10, 2022 | 12:34 IST

stone pelting on the house of Jalgaon Shivsena Mayor Ganapati immersion procession turned violent : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या मेहरून येथे गणपती विसर्जन मिरवणुकीला हिंसक वळण लागले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाली.

stone pelting on the house of Jalgaon Shivsena Mayor
जळगावमध्ये उद्धव ठाकरे समर्थक महापौरांच्या घरावर दगडफेक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जळगावमध्ये उद्धव ठाकरे समर्थक महापौरांच्या घरावर दगडफेक
  • गणपती विसर्जन मिरवणुकीला हिंसक वळण
  • पोलीस हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

stone pelting on the house of Jalgaon Shivsena Mayor Ganapati immersion procession turned violent : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या मेहरून येथे गणपती विसर्जन मिरवणुकीला हिंसक वळण लागले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक झाली. ही धक्कादायक घटना काल (शुक्रवार ९ सप्टेंबर २०२२) घडली. दगडफेक रात्री पावणे अकराच्या सुमारास झाली. 

जय श्रीराम मित्र मंडळाच्या गणपतीची विसर्जनासाठीची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत एक गाव एक गणपती मंडळाशी संबंधित काही सदस्य आले. ही मंडळी नाचत वाजतगाजत पुढे जात होती. महापौर निवासस्थानासमोर मिरवणूक येताच परिस्थिती बदलली. जय श्रीराम मित्र मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एक गाव एक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच काही पेटते सुतळी बॉम्ब घराच्या दिशेने फेकले.

आपल्या मिरवणुकीत घुसखोरी करून महापौरांच्या घरावर हल्ला सुरू असल्याचे पाहून जय श्रीराम मित्र मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यामुळे जय श्रीराम मित्र मंडळ आणि एक गाव एक गणपती मंडळ या दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते थोडा वेळ एकमेकांसमोर आले. तणाव वाढला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दगडफेक करणाऱ्या काही जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दगडफेकीचे कारण समजलेले नाही. पण स्थानिक राजकीय संघर्षातून दगडफेक झाल्याची शक्यता व्यक्त होत 
आहे.

दगडफेक झाली त्यावेळी महापौर घरात नव्हत्या पण त्यांचे सासरे घरात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बायपास झाली होती. पण या सगळ्याचा विचार न करता हल्लेखोरांनी महापौर बंगल्याच्या दिशेने काही पोती गुलाल उधळला आणि दगडफेक केली. महापौरांच्या जाऊने घरात सासरे आजारी आहेत त्यामुळे शांतपणे पुढे जाण्याचे आवाहन केले पण दगड फेकणाऱ्यांनी काहीच ऐकले नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावरच परिस्थिती नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरिता कोल्हे, मानसिंग सोनवने यांनी तातडीने महापौर बंगल्याला भेट दिली. 

पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तोपर्यंत दगडफेक झाल्यामुळे परिसरातील काही वाहनांच्या काचा फुटल्याचे आढळले असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी माझ्या जाऊला मारहाण केली असा आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला.

मुंबईसह ६ शहरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका

चित्रविचित्र पुतळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी