गुजरातमधील 2 वर्षीय चिमुकलीचा नंदुरबारमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक माहिती झाली उघड

जळगाव
सुनिल देसले
Updated Jul 07, 2022 | 22:28 IST

Crime News: एका दोन वर्षीय मुलीचा सेप्टिक टँकमध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • दोन वर्षीय मुलीचा सेप्टिक टँकमध्ये आढळला मृतदेह
  • मृतक चिमुकली गुजरातमधील निवासी असल्याची माहिती
  • शवविच्छेदनात धक्कादायक माहिती झाली उघड 

नंदुरबार : एका दोन वर्षीय मुलीचा मृतदेह गटाराच्या टाकीत आढळला होता. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने संपूर्ण नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली आणि अखेर या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. या चिमुकलीची हत्या करुन तिचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचं समोर आलं आहे. यासोबतच आणखीही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

शवविच्छेदनात धक्कादायक खुलासा

नंदुरबारमधील रेल्वे कॉलनी परिसरात गटारीच्या टाकीत सापडलेल्या मुलीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. नंदुरबार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यात मोठ यश आले आहे. साधारणत: दोन वर्षाच्या असणाऱ्या या चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा गळा दाबुन निघृणपणे हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

हे पण वाचा : 'काय झाडी, काय हॉटेल..' डायलॉग फेम आमदार शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले, आमदार निवासात घडली मोठी दुर्घटना

या सर्व घटनेप्रकरणी नंदुरबार पोलिसांनी एका दांपत्यासह चार जणांना अटक केली आहे. गुजरातमधून या मुलीला आणल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही मुलीचे नाव आणि तिचा ठिकाणा समजला नसला तरी पोलीस त्याबाबत अधिकचा शोध घेत आहेत. 

हे पण वाचा : 'या' टिप्सने झटपट जिंकाल जोडीदाराचा विश्वास

अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे भंगार गोळा करण्याचे काम करत असुन त्यांनी कुठल्या उद्देशाने हा सारा प्रकार केला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र दोन वर्षांच्या या चिमुकलीवर एकाहून अधिक व्यक्तीने शारीरिक अत्याचार केल्याचं देखील बोलले जात आहे. पोलिसांनी अतिशय किचकट असलेल्या या तपासाचा छडा लावला असला तरी या निदर्यी घटनेबाबत समाजात मात्र संपात व्यक्त होताना दिसत आहे.

कसा समोर आला प्रकार? 

दोन दिवसांपूर्वी दोन व्यक्ती सकाळच्या सुमारास शौचालयासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना त्या परिसरात अतिशय दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर त्या दोघांनी तेथे असलेल्या गटारीत वाकून पाहिले आणि त्यांना एकच धक्का बसला. त्या गटाराच्या टाकीत एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. तसेच आपला तपास सुरू केला. त्यानंतर आता या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी