उद्धव ठाकरेंच्या हातातून धनुष्यबाणही जाणार; तर गुलाबराव म्हणतात, खरी शिवसेना आमचीच

जळगाव
भरत जाधव
Updated Jul 06, 2022 | 06:53 IST

राज्यातील राजकारणातील सर्वात मोठ्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सर्वसामान्य होत आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारासह एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. विधानसभा अध्यक्ष निवडीसह बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाने विजय मिळवला. आता शिंदे गटातील आमदार आप-आपल्या मतदारसंघात गावी परतले आहेत.

 After the arrival of MLAs and former MPs, the Shinde group will also get a bow and arrow
आमदार,माजी खासदार आल्यानंतर शिंदे गटाकडे धनुष्यबाणही येणार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गुलाबराव पाटील हे बंडानंतर आपल्या गावी पहिल्यांदाच दाखल झाले.
  • शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार संपर्कात
  • येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही आम्हालाच मिळेल. - गुलाबराव पाटील

जळगाव : राज्यातील राजकारणातील सर्वात मोठ्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सर्वसामान्य होत आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारासह एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. विधानसभा अध्यक्ष निवडीसह बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाने विजय मिळवला. आता शिंदे गटातील आमदार आप-आपल्या मतदारसंघात गावी परतले आहेत. खुल्यापद्धतीने हे आमदार आपली नाराजी आणि भूमिका मांडू लागले आहेत. त्याचसोबत त्यांना मोठे दावे देखील करत आहेत. अशातच जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुलाबराव पाटील हे बंडानंतर आपल्या गावी पहिल्यांदाच दाखल झाले. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाळधी या त्यांच्या गावी पोहोचले. यावेळी त्यांनी मॅक्स महाराष्ट्रासाठी दिलेल्या मुलाखतीत गुलाबराव पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Read Also : CID पुन्हा सुरु होणार?, शिवाजी साटम यांनी दिले संकेत

याचबरोबर पाटलांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची चिंता वाढविणारं वक्तव्य यावेळी केलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आपलीच शिवसेना खरी असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हही आम्हालाच मिळेल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. दूर गेलेल्या नाराज शिवसैनिकांना आपण लवकरच भेटणार आहोत. खरी आणि शिवसेना पुन्हा उभी करायची असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. 

Read Also : Karnataka: आधी वाकून नमस्कार केला अन् नंतर चाकू भोसकला...

गुलाबराव पाटील यांच्या या धक्कादायक विधानामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे. आता शिवसेना आणि शिंदे सेना यांची यापुढील लढाई आता चिन्हासाठी आणि नावासाठी असणार आहे, हे निश्चित होऊ लागलं आहे. ही सर्व परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसेच बंडाचं मोठं कारण ठरलेल्या संजय राऊतांना दिवसरात्र काम करावं लागेल. पक्षात बाकी असलेल्या आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते, माजी आमदारर खासदार, माजी खासदार यांना संभाळण्यासह धनुष्यबाणही पकडून ठेवावे लागणार आहे. नाहीतर डावावर डाव खेळत शिंदे गटाच्या हातात धनुष्यबाण कधी जाईल याची साधी त्यांना कल्पनाही राहणार नाही. 
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी