Rohini Khadse Car Attack : एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला, नेमकं कारण काय?

जळगाव
भरत जाधव
Updated Dec 28, 2021 | 08:07 IST

Rohini Khadse Car Attack : मुक्ताईनगर (Muktai Nagara) जिल्हा बँकेच्या (District Bank) माजी अध्यक्षा (Former President) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर (Rohini Khadse) यांच्या कारवर हल्ला झाला आहे.

Rohini Khadse Car Attack
रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली.
  • रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रमानंतर मुक्ताईनगरकडे येत असताना हल्ला.
  • राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातील वादामुळे हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Rohini Khadse Car Attack : जळगाव : मुक्ताईनगर (Muktai Nagara) जिल्हा बँकेच्या (District Bank) माजी अध्यक्षा (Former President) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर (Rohini Khadse) यांच्या कारवर हल्ला झाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून दोन दुचाकीवरुन(Two-wheeler) आलेल्या अज्ञात इसमांनी रोहिणीन खडसे यांच्या कारवर दगडफेक (Stone throwing )केली. हा हल्ला केल्यानंतर या हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या हल्ल्यानंतर जळगावातील (Jalgaon) राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी (NCP)-शिवसेना (ShivSena) वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रमानंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर त्यांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले, असल्याची माहिती खडसे कुटुंबियांनी दिली आहे. 
हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मागील आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असल्याने त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातील वाद काय? 

बोदवड नगरपंचायत निवडणुकीनंतर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना आमदार चंद्रकात पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप रोहणी खडसेंनी केला. महिलांची छेड काढणाऱ्या आणि त्यांची अडवणूक करणाऱ्यांना चोपच नाही, तर त्यांचे हात तोडून टाकू, असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यावरुन हा सर्व वाद टोकाला पोहचला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले. त्याच वादातून रोहिणी खडसेंच्या गाडीवर हा भ्याड हल्ला केल्याचंही म्हंटलं जात आहे. 

वादाला असं फुटलं तोंड

जिल्ह्यात 21 डिसेंबरला बोदवड नगर पंचायतीसाठीच्या निवडणुकीची मतदानप्रक्रिया पार पडली. या दिवशी राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. या दरम्यान सेनेचे कार्यकर्ते हे माझ्या अंगावर धावून आले असा आरोप रोहिणी खडसेंनी केला. यासर्व प्रकाराची तक्रार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर शिवसेनेने राष्ट्रवादी आपल्यावर खोटे आरोप करतेय, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

दोन्ही पक्षांकडून जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली. यानंतर वादाला तोंड फुटलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या स्टेटसवरुन. यामुळे आता वाद आणखी चिघळला. यावरुन राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांशी सेनेचे पदाधिकारी हे असभ्यपणे वागून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. यावरुन राष्ट्रवादीने 24 डिसेंबरला स्थानिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला.   

आमदार पाटील यांच्याकडून निषेध

दरम्यान, मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. या  हल्ल्याची उच्चस्तरीय तपास समिती मार्फत चौकशी करण्यात यावी ,अशी मागणी विधानसभेत करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी