Girish Mahajan : एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की खून झाला? गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे वाद

जळगाव
Updated Nov 21, 2022 | 22:00 IST

Girish Mahajan : एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला अशा प्रश्न राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केल्याने एकच वाद निर्माण झाला आहे. महाजनांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनीही उत्तर दिले आहे. हवे तर चौकशी करा असे खडसे यांनी उत्तर दिले आहे

थोडं पण कामाचं
  • एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला अशा प्रश्न राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केला
  • महाजनांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनीही उत्तर दिले आहे.
  • हवे तर चौकशी करा असे खडसे यांनी उत्तर दिले आहे

Girish Mahajan : जळगाव : एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला अशा प्रश्न राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केल्याने एकच वाद निर्माण झाला आहे. महाजनांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनीही उत्तर दिले आहे. हवे तर चौकशी करा असे खडसे यांनी उत्तर दिले आहे. (eknath khadase son commit suicide or murdered minister and  bjp leader girish mahajan questions)

बरे झाले गिरीश महाजन यांना मुलगा नाही असे विधान एकदा एकनाथ खडसे यांनी केले होते. आता त्यावर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाने २०१३ साली गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आता यावर खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा माझ्या मुलाने असे पाऊल उचलले तेव्हा मी त्याच्यापासून १५ किलोमीटर दूर होतो. जेव्हा माझ्या मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्याची पत्नी रक्षा खडसे त्याच्यासोबत होती. याचा अर्थ महाजन रक्षाताई खडसे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. गिरीश महाजन यांना मुलगा नाही ही चांगली बाब नाही. मुलगा नसण्याचे दुःख काय आहे हे मलाही माहित आहे. प्रत्येकाला मुलगा असावा आणि चिरंजीवी असावा अशी माझी प्रार्थना आहे. परंतु गिरीश महाजन यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून फार चुकीचे केले आहे. जर महाजन यांना माझ्या मुलाच्या आत्महत्येत काही काळेबेरे वाटत असेल तर त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करावी. माझी ईडीकडून तसेच अनेक संस्थांकडून चौकशी केली आहे. आता ही  सुद्धा चौकशी करून पहावी असे खडसे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी