'मला कोणाला चुना लावण्याची गरज भासली नाही', एकनाथ खडसेंची टीका

जळगाव
Updated Sep 22, 2022 | 00:41 IST

JALGOAN Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी आपल्या जिल्ह्यातील विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा खडसे नेमकं काय म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर पुन्हा एकदा साधला निशाणा
  • एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलं प्रत्युत्तर
  • अमित शाह, राजनाथ सिंह यांना आधीपासून भेटत होतो, भेटत राहणार

जळगाव: 'नाथाभाऊ विषयीची गरळ ओकण्यासाठी ही सभा होती. मुख्यमंत्री आणि चार कॅबिनेट मंत्री असताना विकासासाठी एक रुपया मिळाला नाही, त्यामुळे कालची सभा विकासा साठी होती, हिंदुत्वासाठी होती की, नाथाभाऊ यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी होती हा खरा प्रश्न.' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. (eknath khadse responds to opposition criticizes girish mahajan and mla chandrakant patil)

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला देखील खडसेंनी उत्तर दिलं.  '40 वर्षापासून राजकारणात आहे. मात्र कुणाचीही तक्रार नाही. उलट वाळूचे धंदे, अधिकाऱ्यांना शिविगाळ, सट्टा पत्ता जुगार हे यांचेच धंदे.' असा खडसेंनी आरोप केला. 

'भविष्यात नाथाभाऊ एकमेव अडथळा असल्याने अशा पद्धतीने आमदार चंद्रकांत पाटील यांचं विषारी बोलणं आहे.  कामाची स्पर्धा कर, आमदार तर परक्या गावाचं आहे, मात्र या गावाला मुक्ताई हे नाव मी दिलं आहे.  बोदवड हा तालुका केला. असं काही तरी काम आमदाराने करून दाखवावं.' असं आव्हान खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिल आहे. 

मुक्ताईनगर मेळाव्यात खडसेंवर नाव न घेता अनेकांना चुना त्यांनी लावला आहे असं वक्तव्य केलं होतं यावर खडसे म्हणाले की, 'मी अनेकांना चुना लावला ज्यांनी-ज्यांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहार केला अशांना जेलमध्ये पाठवण्यापर्यंत चुना मी लावला.  ही गोष्ट खरी आहे की, माझी आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे. मी कोणत्या टपरीवर काम करणारा नव्हतो.  त्यामुळे मला चुना लावण्याची गरज भासली नाही.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी