धुळे| शहरात आज भीषण आग लागली , मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग ही आग लागली.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही लाखोंची वित्तहानी मात्र झालीय.धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेल्या धनराज काच सेंटर व बॉडी मेकर या दुकानाला अचानक आज भीषण आग लागली .या आगीत लाखोंचा नुकसान झालं असून जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.आगीचा कारण अद्याप गुलदस्तमध्ये असलं तरी आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.मात्र या घटनेमुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला होता.इतर आजुबाजुच्या दुकानांना देखील या आगीची झळ बसली.सध्या हा परिसर पोलिसांनी सील केला आहे.