पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी का आणि कुणाची मागितली माफी?

जळगाव
भरत जाधव
Updated Apr 14, 2023 | 19:08 IST

 शहरात मागील महिन्यात घडलेल्या घटनेबाबत भीमसैनिकाने  गुलाबराव पाटील (Gulabrao patil)यांना जाब विचारत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर घडलेल्या प्रकरणी पालकमंत्री (Guardian Minister)गुलाबराव पाटील चक्क माफी मागतिली.

Guardian Minister Gulabrao patil apologized
मंत्री गुलाबराव पाटलांनी का मागितली माफी ?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन
  • भीमसैनिकाने गुलाबराव पाटील यांना जाब विचारला.
  • ही संपूर्ण घटना काय आहे त्यासाठी पहा हा संपूर्ण व्हिडिओ.

जळगाव :  शहरात मागील महिन्यात घडलेल्या घटनेबाबत भीमसैनिकाने  गुलाबराव पाटील (Gulabrao patil)यांना जाब विचारत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर घडलेल्या प्रकरणी पालकमंत्री (Guardian Minister)गुलाबराव पाटील चक्क माफी मागतिली. आज जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने रेल्वे स्टेशन 
(Railway station) परिसरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. गुलाबराव पाटलांनी आपलं भाषण आटोपल्यानंतर एका भीमसैनिकाने त्यांना रोखत थेट जाब विचारला.  ( Guardian Minister Gulabrao patil apologized to whom and why? )

मागील  महिन्यात जळगाव शहरातील रेड क्रॉस सोसायटीसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात उद्भवलेल्या वादाबाबत त्या भीमसैनिकाने गुलाबराव पाटलांना जाब विचारला. एवढी मोठी घटना घडून देखील तुम्ही त्या ठिकाणी आला नसल्याची आम्हाला खंत असल्याचे तो भीमसैनिक म्हणाला.

अधिक वाचा  :हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी

भीमसैनिक आक्रमक झाल्याचे पाहून गुलाबराव पाटलांनी दिलगिरी व्यक्त करत आपण त्या ठिकाणी का आलो नाही याबाबत स्पष्टीकरण दिलं. अधिवेशनामुळे आपल्याला येता आलं नाही. त्याबाबत आपण क्षमा मागत असल्याचे गुलाबराव म्हणाले. ही संपूर्ण घटना काय आहे त्यासाठी पहा हा संपूर्ण व्हिडिओ..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी