धुळे : धुळे शहर आणि त्याचबरोबर मोहाडी परिसरातील धक्कादायक बातमी समोर येत आहे. धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे १० ते १५ वर्षाच्या चिमुकल्यांचा जीव भटक्या कुत्र्यांमुळे धोक्यात आहे.
अधिक वाचा : जाणून घ्या 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस
मोहाडी परिसरात असलेले जय शंकर कॉलनी,वर्षा वाडी,पिंपळादेवी नगर परिसरातील ३ ते १२ वयोगटाच्या मुलांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. या बालकांना गंभीर जखमा झाल्याच देखील समोर येत आहे. परिसरातील नगरसेवकांतर्फे महापालिका प्रशासनाला वारंवार मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात तक्रारी आणि लेखी निवेदनाद्वारे बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती, पण महानगरपालिका प्रशासनाने अशा प्रकारची कुठलीच कारवाही नाही केली असे समोर आले आहे.
सर्व मुलांना शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केल आहे. स्थानिकांनी असा आरोप लावला आहे की, महानगरपालिका प्रशासनाने वेळेवर पाऊले उचलली असती तर हा प्रकार घडला नसता.