महाराष्ट्र हादरला ! तिघांची एकत्र आत्महत्या? दोन तरुणी आणि एक तरुण आढळला मृतावस्थेत, चॉकलेट, फुलं आणि हार मृतदेहाजवळ आढळले

2 women and one young man found dead : तासगाव तालुक्यातील  मणेराजुरीतील एका  डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघड

2 women and one young man found dead
महाराष्ट्र हादरला ! दोन तरुणी आणि एक तरुण आढळला मृतावस्थेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार
  • घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली
  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. 

सांगली : तासगाव तालुक्यातील  मणेराजुरीतील एका  डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. सदर घटनेमुळे जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर घटना ही प्रेमाच्या त्रिकोणातून? झाली आहे की यांचा कोणी घातपात केला आहे अशी चर्चा आता संपूर्ण जिल्हाभरात होत आहे. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी मधील डोंगरावरची येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली

दरम्यान, या घटनेमध्ये धक्कादायक बाब म्हणजे, या तिघांच्या मृतदेहाजवळ काही चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली देखील सापडली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की या तिघांचा घातपात करण्यात आला आहे? अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मृतदेहाशेजारी विषारी द्रव्य असलेली बाटली सापडल्याने या आत्महत्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. 

घटनास्थळी डोरमिक्स नावाची द्राक्षबागेवर फवारण्याचे विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. आत्महत्या करणाऱ्यांची नावे ही हरीश हणमंत जमदाडे २४ रा मनेराजुरी,  प्रणाली उद्धव पाटील १९ रा मनेराजुरी,  शिवानी चंद्रकांत घाडगे रा हतीत ता सांगोला असं तरुण तरुणीची नावे आहेत. तिघांच्या आत्महत्येचा बातमीने तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

यातील तिघेजणही मणेराजूरीमध्ये राहण्यास होते

या तिघांनी डोंगराच्या पायथ्याशी गाडी लावून डोंगरावर जाऊन आत्महत्या का केली?  तिघांच्या आत्महत्या मागे प्रेमाचा त्रिकोण आहे का? का या तिघांचा  घातपात झलाय का? याचा पोलीसाना संशय आहे. दरम्यान, डोंगराकडे जाणारा रोड हा सुनसान असल्याने हे तिघेजण मध्यरात्री गाडी घेऊन डोंगराकडे का  गेले? डोंगराच्या पायथ्याला गाडी लावली आणि डोंगरावर जाऊन या तिघांनी आत्महत्या केल्याचे चित्र घटनास्थळी दिसून येतं आहे. मात्र आत्महत्या मागचे कारण, मृतदेहाशेजारी चॉकलेट्स, पुष्पगुच्छ, दोन हार कशासाठी आणले गेले होते. नात्यातून किंवा प्रेमाच्या त्रिकोणातुन किंवा लग्नाच्या वादातून ही आत्महत्या आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. यातील तिघेजणही मणेराजूरीमध्ये राहण्यास होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी