Kolhapur Airport : कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून २१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २५.९१ हेक्टर जमिनीची गरज आहे. जमीन अधिग्रहणासाठी राज्य सरकारने हा निधी मंजूर केला आहे. कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांनी यासाठी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी रु. 212 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मनःपूर्वक आभार! कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ विकास अत्यंत महत्वाचा आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक 25.91 हेक्टर आर क्षेत्र जमिनीच्या संपादनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ विकास अत्यंत महत्वाचा आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक 25.91 हेक्टर आर क्षेत्र जमिनीच्या संपादनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.यासाठी, हसन मुश्रीफ, मुख्य सचिव श्रीवास्तव, विमानसंचालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे पाटील यांनी नमूद केल आहे.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी रु. 212 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra जी, उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks जी, महसूलमंत्री ना. @bb_thorat जी यांचे मनःपूर्वक आभार! pic.twitter.com/madHPUrjyt
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) April 19, 2022
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळ विकास अत्यंत महत्वाचा आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक 25.91 हेक्टर आर क्षेत्र जमिनीच्या संपादनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) April 19, 2022
यासाठी, मा. @mrhasanmushrif जी, मुख्य सचिव श्रीवास्तव, विमानसंचालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.@Deepakk75058621
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) April 19, 2022
कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमाल कटारिया यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निधीमुळे कोल्हापूर विमानतळाचा विकास होईल. तसेच उन्हाळ्यात या एअरपोर्टवर प्रवाशांची संख्या वाढली असून विमानतळाचा विकास होणे गरजेचे आहे त्यामुळे इथून अधिक उड्डाणे होतील असे कटारिया म्हणाले.
कोल्हापूर विमानतळावरून सध्या दररोज ६ विमाने उडत आहेत. काही आठवड्यांपूर्वी ही संख्या १० वर पोहोचली होती. सध्या कोल्हापूर विमानतळाहून मुंबई, हैद्राबाद आणि तिरुपतीसाठी फ्लाईट्स आहेत. १ जून पासून अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू होणार आहे. सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १९३० मीटर इतकी आहे. जमीन अधिग्रहाणानंतर विस्तारानंतर ही धावपट्टी २३०० मीटर होणार आहे.