Crime News गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या, मेंदू बाहेर पडेपर्यंत केले वार

A 22-year-old youth was murdered after being chased ; गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कुमार शाहूराज गायकवाड असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुमार गायकवाड हा तरुण राजेंद्रनगर येथे राहत होता. कुमारची तीन ते चार हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केली आहे.

A 22-year-old youth was murdered after being chased
गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या, मेंदू बाहेर पडेपर्यंत केले वार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे
  • कुमार शाहूराज गायकवाड असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे
  • कुमारची तीन ते चार हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केली

कोल्हापूर : राज्यात गुन्ह्याच्या (Crime) घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) गँगवॉरमधून अनेक हत्या झाल्याचे समोर आले असून, पुन्हा एकदा  गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. कुमार शाहूराज गायकवाड असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुमार गायकवाड हा तरुण राजेंद्रनगर येथे राहत होता. कुमारची तीन ते चार हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केली आहे. हत्येचा हा थरार शहरातील डी वाय पी मॉल ते टाकाळा खण परिसरात रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले तर मृतांच्या नातेवाईकांसह राजेन्द् नगरातील शेकडो तरुणांनी सीपीआर च्या अपघात विभागासमोर गर्दी केल्याने तणाव वाढला होता.

अधिक वाचा ; ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार

काही महिन्यांपूर्वी कुमारचा एका टोळीबरोबर वाद झाला होता

मिळालेल्या माहितीनुसार, कुमार गायकवाड हा राजेन्द् नगरातील त्याचा मामा त्र्यंबक गवळी याच्याकडे रहात होता. यावेळी कुमार आणि त्याचा एका टोळीबरोबर वाद झाला होता. या वादातूनच कुमारची हत्या झाली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कुमारचा जेव्हा टोळीबरोबर वाद झाला होता तेव्हा त्याच्यावर राजारामपुरी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून कुमारवर टोळीतील सदस्य पाळत ठेवून होते. रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कुमार डीवायपी मॉलजवळ थांबला होता. काही वेळात तीन ते चार तरुण कुमारजवळ पोहोचले, आणि जुन्या प्रकरणावरून त्याच्याशी वाद घालू लागले. कुमार आणि त्या तरुणांमध्ये वाद सुरू होताच कुमारने पळ काढण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाकडून तो टाकाळा खणीच्या दिशेने पळत सुटला, त्याचवेळी तीन ते चार हल्लेखोरांनी कोयता आणि एडक्याने त्याच्यावर पाठलाग करून हल्ला चढवला. चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवर १८ ते २० वार केले. जमिनीवर कोसळलेल्या कुमारच्या डोक्यात दगड घातला. तसेच डोक्यावर, त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

अधिक वाचा ; मुंबईत पार पाडली जियो सायक्लॉथॉन, टायगर श्रॉफने लावली हजेरी 

कुमार फोन उचलत नसल्याने त्याचे मामा त्याला शोध आले होते

दरम्यान, कुमारची हत्या झाल्यानंतर कुमारच्या मामानी कुमारला फोन केला होता. मात्र, कुमार फोन घेत नव्हता. कुमार फोन उचलत  नसल्याने त्याला शोधण्यासाठी ते उड्डाण पूल परिसरात पोहोचले. त्यावेळी त्यांना भाचा कुमार रस्त्याकडेला गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्यांनी तातडीने कुमारला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, कुमारने कमी वयातच राजेन्द्रनगर परीसरात आपले वलय निर्माण केले होते. मामाचे काही व्यवसाय सांभाळत त्याने तरुणांचा एक गट तयार केला होता. त्याच्या भाईगिरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात सतत झळकत होते.

अधिक वाचा ; अरे बापरे! एका सिल्व्हर सप्लीमेंटमुळे माणूस झाला पूर्ण निळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी