कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे नाव आपल्या ऐकण्यात किंवा समोर आल्यानंतर सहज तोंडातून येणारं वाक्य म्हणजे कोल्हापूरचा (Kolhapur Crime) नाद खुळा, हे वाक्य काही सहज म्हटलं जात नाही. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांसारखी हौस कुठल्याही जिल्ह्यातील लोकं करत नाहीत असं म्हटलं जात. दरम्यान, अशीच हौस इथल्या एका तरुणाने केली होती. कोल्हापूरच्या कळंबा (Kalamba, Kolhapur) परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने चक्क 21 लाख रुपयांची बाईक घेतली होती. आता 21 लाखाची दुचाकी म्हणजे जंगी मिरवणूक तर होणारच, अशीच नाद खुळा मिरवणूक काढत त्याने वाजत गाजत सदर बाईक थाटामाटात घरी आला. पण एका रात्रीत अनर्थ घडला आणि 21 लाख रुपयांच्या बाईकची जळून (Bike Fire) राख झाली. 21 लाख रुपयांची बाईक अवघ्या 15 मिनिटांत जळून खाक झाल्याने बाईकच्या मालकाला मात्र मोठा धक्का बसला आहे.
अधिक वाचा ; बापाने 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हपूरच्या कळंबा येथील एका तरुणाला महागड्या गाड्यांची मोठी हौस आहे. आणि याचं हौसेपोटी त्याने तब्बल 21 लाख रुपयांची महागड्या सुपरबाईक खरेदी केली होती. पण या बाईकचा आनंद त्याला जास्त काळ टिकवता आला नाही. कारण पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कळंबा इथं भीषण आग लागली. या अग्नितांडवात दोन वाहनंही जळून खाक झाली. ज्यामध्ये या सुपरबाईकचा देखील समावेश होता. आग लागताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आले मात्र, अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीचं बाईकची राख झाली होती.
अधिक वाचा ; इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट, वीजबिल भरा घरबसल्या, पाहा कसे
दरम्यान, सदर आगीत एकूण 40 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या आगीत 21 लाख रुपयाच्या बाईकचा देखील कोळसा झाला आहे. अवघ्या 15 मिनिटांत 21 लाखांच्या बाईकचा कोळसा झाला असून, यावेळी बाईकचा मालकही हतबल झाला होता. हौस म्हणून महागडी बाईक खरेदी करुन मिरवणूक काढलेल्या या व्यक्तीचं प्रचंड नुकसान झालं. आगीत तब्बल 40 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलाय. ही आग नेमकी कशामुळे लागली ते कळू शकलेलं नाही.
अधिक वाचा ; काँग्रेस नेत्याने महाराजांची तलवार आणण्यासाठी केली होती धडपड