कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅकेवर ईडीने काल धाड टाकली. दोन दिवसांपासून कागदपत्रांची झडाझडती घेतल्यानंतर आज चौकशीनंतर ईडीने बँकेतील ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे बॅंकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Action by 'ED' on Kolhapur District Bank)
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापसी येथील साखर कारखाना आणि मुलीच्या घरी ११ जानेवारीला 'ईडी'ने धाड टाकली होती. त्यानंतर काल ईडीने पुन्हा कोल्हापूर जिल्हा बँकेत छापा टाकून कागदपत्रांची झाडाझडती घेतली. चौकशीनंतर बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा : Horoscope Today 3 February 2023 : या राशीच्या लोकांना मिळेल आज नशीबाची साथ, वाचा ३ फेब्रुवारीचे राशीभविष्य
ईडीच्या अधिकारींकडून बॅंकेची चौकशी सुरू झाल्यापासून बॅंकेच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळापासून चौकशी केल्यानंतर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, व्यवस्थापक साखर कारखाना विभाग आर. जे. पाटील, अल्ताफ मुजावर, सचिन डोंनकर आणि राजू खाडे या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली होती. दरम्यान, बॅंकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर बँकेच्या कर्मचारी युनियनने ईडीच्या कारवाईचा निषेध केला.