Crime News संपत्तीच्या वादातून मुलाने वडील शौचास जाताच शौचालयच दिलं पेटवून

As soon as the father went to the toilet, the son set the toilet on fire ; मुलानंच वडिलांना जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक जिल्ह्यात सदर घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. तर सदर  प्रकरणी कागल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संपत्तीसाठी वडिलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा मुलगा आणि सून या दोघांविरोधात कागल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

As soon as the father went to the toilet, the son set the toilet on fire
संपत्तीच्या वादातून मुलाने वडील शौचालयात जाताच शौचालय पेटवले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कागल एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली
  • गेल्या अनेक दिवसांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वडील आणि मुलगा यांच्यात वाद सुरु होता 
  • वडील शौचालयात गेल्यानंतर मुलाने चक्क बाहेरुन रॉकेल टाकून शौचालय पेटवलं

कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) व्हन्नूरमध्ये (Vannur) एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून (Property Disputes) मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वडील शौचालयात गेल्यानंतर मुलाने चक्क बाहेरुन रॉकेल टाकून शौचालय पेटवलं. या घटनेत वडील जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चक्क मालामतेसाठी मुलाने आपल्या वडिलांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. (As soon as the father went to the toilet, the son set the toilet on fire)

अधिक वाचा ; एकनाथ शिंदे 50 आमदारांना खोके देताहेत पण... रामदास कदम बोलले

गेल्या अनेक दिवसांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वडील आणि मुलगा यांच्यात वाद सुरु होता 

मिलेलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून वडील आणि मुलामध्ये मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरु होता. काही दिवसाने हा वाद विकोपाला गेला असल्याचे दिसून येत आहे. यातूनच संतापलेल्या मुलानं रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील कागलच्या व्हन्नूरमध्ये देवबा हजारे हे आपला मुलगा शिवाजी हजारे आणि सून सरला हजारे यांच्यासोबत राहतात. सकाळी देवबा हजारे शैचालयात शौचासाठी गेले होते. त्याचवेळी पाळत ठेवून असलेला मुलगा आणि सूनेनं संधी साधली. दोघांनी बाहेरुन शौचालयाच्या दरवाजाला कडी लावली आणि रॉकेल टाकून शौचालय पेटवून दिलं. त्यावेळी देवबा शौचालयातच होते. देवबा हजारे या घटनेत गंभीर जखमी झाले असून, देवबा हजारे यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा : Weight Loss: लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी 

मुलगा आणि सून या दोघांविरोधात कागल पोलिसांनी गुन्हा दाखल

दरम्यान,  मुलानंच वडिलांना जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याच्या धक्कादायक जिल्ह्यात सदर घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. तर सदर  प्रकरणी कागल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संपत्तीसाठी वडिलांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा मुलगा आणि सून या दोघांविरोधात कागल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत देवबा हजारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा ; पुढील आठवड्यात देशभरात बँक संप, बॅंकिंग सेवांवर परिणाम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी