कोल्हापूर : व्हॉट्सअॅपला (WhatsApp) डीपी (DP) लावला नाही म्हणून प्रियकराने (lover) मारहाण (Beating) केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आजरा (Ajra)तालुक्यातील पोळगाव येथे ही घडली असून या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित किशोर दत्तात्रय सुरंगे याच्याविरोधात आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत संशयित आरोपी किशोर सुरंगे यांने मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याने मयत तरुणीने आत्महत्या केली असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी पोलिसात दिली असून आजरा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सविता खामकर (वय १६ रा.पोळगाव ता. आजरा) आणि किशोर सुरंगे (रा. महागाव ता. गडहिंग्लज या दोघांचे प्रेमसंबंध होते. घरच्यांनाही याची कल्पना होती. या दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरू होती. मुलीचे १८ वय पूर्ण झाल्यानंतर लग्न लावू, असं मुलीच्या वडिलांनी सांगितले होते. सगळं काही सुरळीत होतं, परंतु मुलाला त्याचा फोटो मुलीने तिच्या व्हॉट्सअॅपवर डीपी लावावा असा हट्ट किशोरने धरला आहे. हा हट्ट धरत किशोरने सविताला मारहाण केली. तिला मानसिक त्रास दिला. याचा धक्का सहन न झाल्याने सविताने टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी स्वयंपाक घरातील तुळीला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.