Belgaum Election result: बेळगाव महानगरपालिकेत फुललं कमळ, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं

बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

Bjp get majority in Corporation Election
बेळगाव महानगरपालिकेत फुलतयं कमळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवला
  • 58 जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपने मिळवल्या 35 जागा.

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या (Belgaum Municipal Corporation Election) निवडणुकीची मतमोजणी झाली असून या निकालात भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपने 35 काँग्रेसने 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एमआयएम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण 58 जागांसाठी मतदान झाले, त्याची आज मतमोजणी झाली. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.  दरम्यान समोर आलेल्या निकालाच्या अपडेटनुसार बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 

भाजपने गाठली मॅजिक फिगर 

 58 जागेवर निवडणूक असली तरी बेळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी खासदार आणि आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपचे 2 खासदार, 2 आमदार आहेत. तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी 33 या मॅजिक फिगरची गरज असते. भाजपनं 35 जागा जिंकत निर्विवादपणे सत्ता प्राप्त केली आहे. 

एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं होतं.  मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती, मात्र ते त्यात यशस्वी ठरले नाहीत.    बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचा समावेश होता. 

मतमोजणीला (Belgaum Election Result) सुरुवात होताच महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले पहिले खाते उघडले. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शिवाजी मंडोळकर विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 14 मधून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 27 मधून रवी साळुंखे विजय आणि वार्ड क्रमांक 19 मधून अंकुश केसरकर विजयी झाले. आतापर्यंत 58 पैकी चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी