संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा, भाजपाच्या या आमदाराने केली राऊतांवर बोचरी टीका

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना बिनबुडाचा लोटा म्हणतं अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका केली

Bjp mlc targeted sanjay raut
संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा, भाजपच्या आमदाराने केली टीका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये असं संजय राऊत यांनी म्हटलं होत
  • संजय राऊत यांना बिनबुडाचा लोटा - पडळकर यांची बोचरी टीका
  • संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला

सांगली : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना बिनबुडाचा लोटा म्हणतं अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला, अस देखील पडळकर यांनी म्हटलं आहे. 

फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये असं संजय राऊत यांनी म्हटलं होत

माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण मिळवून देईन, असे फडणवीस म्हणतात. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी हे वक्तव्य मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं होत. दरम्यान, त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. 

संजय राऊतांचा बोलवता धनी दुसराच असतो - रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सतत कुठल्या न कुठल्या कारणावरून चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसींचं रद्द झालेले आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली असून, मराठा समाजाच्या आरक्षणा बाबतीत देखील राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. यासोबत संजय राऊत जे बोलतात ते त्यांचं मत नसतं त्यांचा बोलवता धनी त्यांना तस बोलायला भाग पाडतो, असं म्हणत दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ईडीची रेड, सीबीआयची रेड, मागासवर्गीयांना नोकरीतील पदोन्नती आरक्षण, धनगर समाजाचे व ओबीसीचे आरक्षण, आणि केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम हे सरकार करत आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं.  

ओबीसींचं जे आरक्षण रद्द झाले आहे,त्याचा केंद्र सरकारशी संबंध नाही.

ओबीसींचं जे आरक्षण रद्द झाले आहे. त्यावर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. मात्र, आरक्षण रद्द होण्याची आणि केंद्र सरकारशी संबंध नाही. इंपेरियल डेटा हा मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून राज्य सरकारने कोर्टाला दिला नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली असल्याचं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटल आहे. जो पर्यंत इंपेरियल डेटा राज्य सरकार कोर्टाला देणार नाही तो पर्यंत आरक्षणाला स्थगिती असणार आहे, असही दानवे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी