सांगलीत गनिमी काव्यानं झरे गावच्या हद्दीवर पार पडली बैलगाडा शर्यत

सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं.

bullock cart race done by in sangali zare gaon
सांगलीत गनिमी काव्यानं झरे गावत पार पडली बैलगाडा शर्यत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली आहे.
  • आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं.
  • सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे बैलगाडी शर्यत कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने कंबर कसली होती.

सांगली : सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे बैलगाडी शर्यत कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने कंबर कसली होती.

या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती ठिकठिकाणी नाकेबंदी होती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तरीही झरे गावाच्या हद्दीवर वाक्षेवाडी त्या पठारावर गनिमी काव्याने बैलगाडी शर्यत पार पडली. जाहीर केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या ऐवजी गनिमीकाव्याने अन्य ठिकाणी बैलगाडी शर्यत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तो खरा ठरला आहे, सर्व यंत्रणांना सुगावा न लागू देता बैलगाडी शर्यत पार पडली आहे. 


एका रात्रीत दुसरा ट्रॅक, सकाळी साडे पाच वाजण्याच्या आत शर्यत पूर्ण!

पडळकर यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला शर्यतीसाठी ट्रॅक उभारण्यात आला होता.  मात्र याचा सुगावा लागताच पोलिसांनी ट्रॅक उध्वस्त केला होता. मात्र पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पडळकर समर्थकांनी तिथूनच पाच किमी अंतरावर दुसरा ट्रॅक मध्यरात्रीच्या सुमारास केला आणि सकाळी पाच वाजता ही स्पर्धा पार पडली.

या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. अजूनही आमदार गोपीचंद पडळकर शर्यतीच्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. सकाळी पावणे सातच्या सुमारास ते आपल्या घरातून बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी जायला निघाले. 

स्पर्धेनंतर पडळकर समर्थकांचा मोठा जल्लोष

गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन मोठं राजकारण रंगलेलं होतं. बंदी असली तरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणारच, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी मांडली होती. तर आम्ही परवानगी देणार नाही, अर्थात शर्यत पार पडणार नाही, अशी भूमिका पोलिस-प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे शर्यत पार पडणार की नाही, याची राज्यभरात मोठी उत्सुकता होती. अखेर पडळकर समर्थकांनी स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन केलेलं आहे. स्पर्धेनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

“काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी