कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता आहे. पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र, पाटील यांनी ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, पक्षातील जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असून, पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा : रशियाकडून भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा होईल
चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ट्वीट करत म्हटलं आहे की, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपावर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांचे आभार. या पोटनिवडणुकीत अविरत कष्ट घेणारे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त केल्याबद्दल त्यांचंही मनापासून कौतुक. मतदारांचा कौल मान्य करून आपलं जनसेवेचं निरंतर व्रत यापुढेही कायम ठेवूया! असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी कुठल्याही निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा करणं आपल्या हातात असतं आणि आम्ही ती केली असंही म्हटलं आहे.
कुठल्याही निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा करणं आपल्या हातात असतं आणि आम्ही ती केली❗#Kolhapur #KolhapurByElection #Maharashtra #BJP #MVA pic.twitter.com/mwbegqXi60
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 16, 2022
अधिक वाचा : मनसेकडून भाजप नेत्यांना हनुमान चालीसा पुस्तकांची भेट
दरम्यान, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं असल्याचं बोललं जात आहे. एकूण २६ फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. जयश्री जाधव यांचा १८,९०१ मतांनी विजय झाला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला.
अधिक वाचा : पाकिस्तान भारताविरूद्ध द्वेष पसरवण्यासाठी करतोय हे काम