राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी कारणांची सगळी यादी पूर्ण, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट !

chandrakant patil targeted mahavikasaghadi goverment : लोक विचार करून आपलं मत ठरवतात. कोण आजारी आहे. कोण जेलमध्ये आहे. राज्यात सगळा गोंधळच सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते? असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केले

chandrakant patil targeted mahavikasaghadi goverment
राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी यादी पूर्ण चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते? – चंद्रकांत पाटील
  • कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी माहिती द्यावी - चंद्रकांत पाटील
  • इतर सर्वांना बाजूला करण्यात आले आहे त्यामुळे सेनेतील घुसपट बाहेर पडेल

कोल्हापूर : राज्यात आरोग्य विभागाच्या आणि म्हाडाच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचं उघड झाल असून, या प्रकरणावरून आता भाजप राज्य सरकारला धारेवर धरत असल्याचं पहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर जोरदार टीका केली आहे. एक दोन नव्हे तर तीन परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या सर्वांची पाळंमुळं राजकीय व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत. त्यावरून सीबीआय चौकशीची मागणी आम्ही लावून धरणार आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, राज्यपालांनी एखादा निरोप पाठवला तर तुम्ही तो नाकारता. म्हणजे राज्यपालांचा तुम्ही अपमान करता. राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची कारणांची सगळी यादी पूर्ण झाली आहेत, असा गौप्यस्फोट देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते? – चंद्रकांत पाटील

लोक विचार करून आपलं मत ठरवतात. कोण आजारी आहे. कोण जेलमध्ये आहे. राज्यात सगळा गोंधळच सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते? असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केले. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद (Chandrakant Patil Press ) घेतली असून, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. जे जे त्रासदायी होईल ते यांना नको आहे. तपास यंत्रणा आणि भाजपचा कोणताही संबध नाही. असंही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी माहिती द्यावी - चंद्रकांत पाटील

,"कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी माहिती द्यावी. काही गेले असतील तर त्याची कारणं वेगळी असतील." असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.  "अमित शाह गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले होते. सहकारातील खूप कळणारा माणूस सहकार विभागाला मिळाला. त्यामुळे यापुढे सहकार वाढण्यास मदत होईल, असे सांगत चंदक्रांत पाटील म्हणाले.

 

सामनामधून टीका होणार

आता माझ्या बोलण्यावरून उद्या सामनामधून टीका होणार यात शंका नाही, अशी कोपरखळी चंद्रकांत पाटील यांनी मारली, त्याचबरोबर  पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत हेच सरकारचे प्रवक्ते असल्याचं  पाहायला मिळत आहे. इतर सर्वांना बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे सेनेतील घुसपट बाहेर पडेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी