chandrakant patil targeted sanjay raut चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका, राऊतांना बोर्नव्हिटा पिण्याची गरज

chandrakant patil targeted sanjay raut in kolhapur : पाटील यांनी मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. एनआयएनं मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. असंही पाटील म्हणाले.

chandrakant patil targeted sanjay raut in kolhapur
राऊतांना बॉर्नवीटा पिण्याची गरज - चंद्रकांत पाटील   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एनआयएनं मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे  - चंद्रकांत पाटील
  • उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही?
  • . फडणवीस आणखी पत्ते बाहेर आणतील – चंद्रकांत पाटील

chandrakant patil targeted sanjay raut कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार तथा जेष्ठ नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांना बोर्नव्हिटा पिण्याची गरज आहे कारण रोज काही ना काही बोलत असतात. बोलून बोलून दमतात. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दररोज सकाळी बोलून बोलून दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच बोलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे. असं पाटील म्हणाले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

एनआयएनं मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे  - चंद्रकांत पाटील

मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं सांगतानाच आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही. दरम्यान, पाटील यांनी मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. एनआयएनं मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. असंही पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही?

दरम्यान, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास होत असून, त्याच्यावर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात भरती झाले होते. त्यावरूनही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? असा सवाल करत पाटील म्हणाले की, याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतं आहे. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, अशी आठवणही पाटील यांनी यावेळी करून दिली.

 

. फडणवीस आणखी पत्ते बाहेर आणतील – चंद्रकांत पाटील

एसटी कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचं पण नाही. कुठल्याही मुद्यावर बोललं की राजकारण केलं असं सत्ताधारी म्हणत असतात. पण आम्ही सर्वच मुद्द्यावर बोलत राहणार. ज्यांचं जळतं. त्यालाचं कळतं, असंही पाटील म्हणाले. नवाब मलिकांनी आ बैल मुझे मार हे सुरू केलं आहे. ते स्वत:च खड्ड्यात पडत आहेत. स्वत:ची कबर ते स्वत: खोदत आहेत, असं पाटील म्हणाले होते. तसेच देवेंद्र फडणवीसांनी एकचं पत्ता बाहेर काढला आहे. फडणवीस आणखी पत्ते बाहेर आणतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. ते म्हणाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी