उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी

Congress Jayashree Jadhav won North Kolhapur by-election : उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मते मिळाली तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली.

Congress Jayashree Jadhav won North Kolhapur by-election
उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी 
थोडं पण कामाचं
  • उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी
  • जयश्री जाधव यांचा १८ हजार ८०० मतांनी विजय
  • जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली

Congress Jayashree Jadhav won North Kolhapur by-election : कोल्हापूर : उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मते मिळाली तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. जयश्री जाधव यांचा १८ हजार ८०० मतांनी विजय झाला.

याआधी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची निवडणूकपूर्व युती होती. या युतीमध्ये कोल्हापूरची जागा शिवसेनेने लढविली होती. निवडणुकीत शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला होता आणि काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. पण चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. रिक्त झालेल्या जागेसाठी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. आता जयश्री जाधव यांच्या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर या जागेवर काँग्रेसने हक्क सांगितल्यास शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र होते. सत्ताधारी आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचार केला होता. भाजपकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांनी प्रचारल केला होता. दोन्ही बाजुंनी दिग्गज नेत्यांनी प्रचार केल्यामुळे पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर या निवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला.

विजयानंतर आपल्या हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा विजय झाला असे जयश्री पाटील म्हणाल्या. विजयामुळे या भागात महाविकास आघाडी आणखी भक्कम झाल्याचे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी