आजोबांनी केलं वयाच्या 'इतक्या' वर्षी लग्न, वधूसाठीही करावी लागली लागली मोठी कसरत, पहा काय लग्नामागची कहाणी

मिरजेत ७९ वर्षांच्या आजोबांनी ६९ वर्षांच्या आजींशी लग्न केले. महापालिकेच्या बेघर केंद्रात निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी निवृत्त शिक्षकाने ही लग्नाची गाठ बांधली आहे.

Dadasaheb Salunkhe got married at the age of 79
आजोबांनी केलं वयाच्या 'इतक्या' वर्षी लग्न वधूसाठीही संघर्ष   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आजोबांनी वयाच्या ७९ व्या वर्षी लग्न केलं आहे
  • साळुंखे यांनी ६६ वर्षाच्या आजी सोबत आपली लग्नगाठ बांधली.
  • बेघर केंद्रात निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी केला विवाह

सांगली : लग्नाचे वय किती असावे याला मर्यादा नसली तरी वयाच्या ३५ वर्षापर्यंत लग्न केल्यास ते लग्न शोभून दिसत असं म्हणातात. मात्र, मिरज येथे (sangali miraj) एक अनोखा लग्नसोहळा पार पडला आहे. एका आजोबांनी वयाच्या ७९ व्या वर्षी लग्न केलं आहे. तर वधूचं वय देखील काय कमी नव्हत त्या देखील ६९ वर्षाच्या आहेत. खरे तर आयुष्याच्या शेवटी वृद्धाप काळात पती-पत्नींचा एकमेकांना आधार असतो. म्हणूनच हे दोघे बोहल्यावर चढले आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या बेघर केंद्रात निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी निवृत्त शिक्षकाने ही लग्नाची गाठ बांधली आहे.

या कारणामुळे केलं ७९ वर्षाच्या आजोबांनी लग्न

दरम्यान, सदर ७९ वर्षाच्या आजोबांचे नाव दादासाहेब साळुंखे (dadasaheb salunkhe) असं आहे. ते शिक्षक होते. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद हे त्याचं गाव आहे. दादासाहेब साळुंखे यांच्या पतीने काही वर्षापूर्वी निधन झालं आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यांना एक मुलगा देखील आहे. मात्र, तो दादासाहेब साळुंखे यांच्यापासून वेगळा आहे. त्यामुळे त्यांना पोटाला भाकरी करून घालण्यासाठी देखील कोणी नव्हत. गेल्या काही वर्षांपासून त्यांची ही जगण्याची फरपट सुरू होती. आयुष्याच्या सरते शेवटी कोणाचा तरी आधार आणि तोही पत्नीचा आधार असावा यासाठी दादासाहेब साळुंखे यांनी लग्न करण्याचा विचार केला आणि त्यांनी ६९ वर्षाच्या आजी सोबत आपली लग्नगाठ बांधली.

अशी मिळाला दादासाहेब साळुंखे यांना जोडीदार

सुरुवातीला साळुंखे यांनी लग्न करण्याची परवानगी आपल्या परिवारातील सदस्यांकडून मिळवली. मात्र, पुढची मोठी अडचण ही त्यांच्या वयाची होती. वयाच्या ७९ व्या वर्षी लग्नासाठी वधू मिळणार कुठे? त्यापुढे जाऊन जर विचार केला तर साळुंखे उद्योजक किंवा धनाढ्य नव्हते त्यामुळे वधू शोधणे हे फार कठीण होत चालले होते. मात्र, म्हणतात ना प्रयत्न केल्यावर काहीही मिळत तसचं  दादासाहेब साळुंखे यांनी आपला प्रयत्न सुरु ठेवला आणि त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून निराधार महिलांचा सांभाळ करणाऱ्या मिरज येथील बेघर केंद्राची माहिती मिळवली, आणि साळुंखे यांनी थेट आस्था बेघर महिला केंद्र गाठलं आणि तिथेचं त्यांना आपल्या जीवनाची सोबती सापडली. 

असा झाला विवाह संपन्न?

सुरेखा शाहीन शेख या आस्था बेघर केंद्राच्या (Astha Homeless Center Sangli) प्रमुख आहेत. त्यांना साळुंखे यांनी आपली कहाणी सांगितली त्यानंतर सुरेखा शाहीन शेख यांनी बेघर केंद्रात असणाऱ्या शालिनी या ६९ वर्षीय महिलेची गाठ घालून दिली, मग दोघांचे विचार जुळले व एकमेकांचे विचार,सुख- दुःख वाटून घ्यायचा निर्णय दोघांनी घेतला. बेघर केंद्रामध्ये मोठ्या आनंदात वयाची बंधने झुगारून हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. याप्रसंगी साळुंखे यांचे पै.पाहुणे, बेघर केंद्रातील समदुःखी महिला यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडलं. आस्था समाज सुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या फोटोला पुष्पहार व वृक्षाला पाणी घालून,फुलांच्या अक्षदा टाकत हा विवाह संपन्न झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी