भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो? : फडणवीस

Devendra Fadanvis Slams Mahavikas Aghadi Over Hindutva And Hinuman Chalisa : भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो; असा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

Devendra Fadanvis Slams Mahavikas Aghadi Over Hindutva And Hinuman Chalisa
भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो? : फडणवीस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो? : फडणवीस
  • शाहू फुले यांच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करत आहे
  • महापुराच्या वेळी भाजपने किती मदत दिली आणि महाविकास आघाडीने काय केले याची जाणीव कोल्हापूरच्या मतदारांना आहे

Devendra Fadanvis Slams Mahavikas Aghadi Over Hindutva And Hinuman Chalisa : कोल्हापूर : भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो; असा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पार्टीचा श्वास हिंदुत्व आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कमी वेळ आमच्या पक्षात होते. त्यांना आमचा पक्ष समजला नाही. त्यांना भगव्याचा तिटकारा आहे. शाहू फुले यांच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करत आहे; अशी टीका फडणवीस यांनी केली. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फडणवीस यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली.

महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते मतदारांमध्ये दहशत बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दहशतीला झुगारून मतदार भारतीय जनता पार्टीला मतदान करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

उत्तर कोल्हापूर हा हिंदु्ववादी मतदारसंघ आहे. आमच्या विचारला मानणारा हा मतदारसंघ आहे. राजकारणात गणित चालत नाही तर केमिस्ट्री चालते आणि या मतदारसंघातील मतदारांची केमिस्ट्री आमच्यासोबत आहे. त्यामुळे पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पांडुरंग पावला आता कोल्हापुरात आई अंबाबाई निश्चितच आम्हाला आशीर्वाद देईल; असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महापुराच्या वेळी भाजपने किती मदत दिली आणि महाविकास आघाडीने काय केले याची जाणीव कोल्हापूरच्या मतदारांना आहे. महविकास आघाडीच्या कारभारामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सत्ताधारी महविकास आघाडीला स्वतः पलिकडे काही दिसतच नाही. जनता या महाविकास आघाडीला कंटाळली आहे. यामुळे पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल आणि भाजपच्या आमदारांची संख्या १०७ होईल; असे फडणवीस म्हणाले. भाजपचा विधानसभेतील १०७वा आमदार होण्याचा मान सत्यजित कदम यांना मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने उर्दू कॅलेंडर काढून त्यावर हिंदूहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे छापले याचा अर्थ समजून घ्या; असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरी विजेता कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील यास भाजपच्या वतीने पाच लाख रुपये देण्याची व कोल्हापुरात जंगी सत्कार करण्याची घोषणा केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी