कोल्हापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दररोज मोठी वाढ होताना दिसत आहे. ४ दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी झालेल्या हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक मोठे आरोप केले जात आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या विरोधात आता मराठा समाजाच्यावतीने देखील एक याचीका दाखल करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधी केस लढताना बेकायदेशीर पैसे गोळा केले, असा गंभीर आरोप दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्याचबरोबर पाटील यांनी अशी तक्रार ही दाखल केली आहे.
अधिक वाचा : दशावतार सुरु असतानाचं कलाकाराला आला हृदयविकाराचा तीव्र झटका
मराठा समाजाने त्यांना आरक्षण मिळावे या कारणासाठी मोठे मोर्चे काढले. त्याचबरोबर त्यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यामुळे मराठा समाजाला अद्यापही मराठा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. याच प्रकरणावरुन आता मराठा समाजही आक्रमक होताना दिसत आहे. कारण गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आता मराठा समाजाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक वाचा : हैदराबादच्या संघाला मोठा झटका, त्रिपाठी नंतर हा खेळाडू बाहेर
तक्रारदार दिलीप पाटील यांनी लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे अन्यथा ते पुरावे नष्ट करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच सदावर्तेंनी न्यायमूर्तींच्या विरोधातही अपशब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधी केस लढताना बेकायदेशीर पैसे गोळा केल्याचा आरोप या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक वाचा : सोमय्या पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून समन्स जारी