ED And IT Raid on Hasan Mushrif House : कोल्हापूर: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने (ED)आणि आयकर विभागाने (Income Tax department)एकत्रितरित्या पहिली कारवाई केली आहे. या दोन्ही विभागाकडून राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ ((Hasan Mushrif ) यांच्या घरावर छापे मारले आहेत. कागलचे माजी नगराध्यक्ष (Former mayor) प्रकाश गाडेकर (Prakash Gadekar) यांच्या निवासस्थानी ईडीने सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईविषयी स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.(ED and Income Tax department raid Hasan Mushrif's house;Crowd of supporters at Kagal on road )
अधिक वाचा :ट्रेनमधून तो कोसळला, मदतीसाठी पोलीस देवदूतासारखा धावला
मुश्रीफ हे दुसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मात्र, त्यांना काहीच सापडले नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला होता.
अधिक वाचा : RRR: 'नाटू नाटू' गाण्याला मिळाला बेस्ट ऑरिजनल सॉन्ग अवॉर्ड
आज ईडी आणि आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी माहिती घेऊन बोलतो, एवढीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झालाच नसल्याचं हसन मुश्रीफ यापूर्वी वारंवार सांगत होते. मात्र, आता ईडी आणि आयकर विभागाने एकत्रित छापेमारी केल्याने मुश्रीफ यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.
दरम्यान, अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे. ईडी आणि आयकर विभागाने हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी आज पहाटे 6.30 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. या सर्वांनी मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अधिक वाचा : शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांचा अपघात
मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी होताच मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्या घरासमोर जमून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. कागलमध्ये काही चौकाचौकांमध्ये समर्थकांची मोठी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.
158 कोटी रुपयांचे पुरावे दिले होते. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतु शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. उद्धव ठाकरे यांची तर प्रचंड मेहरबानी होती. फक्त घोटाळे करणे एवढेच या सरकारचे काम होते, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. त्याची चौकशी सुरू झाली आहे. हिसाब तर घेऊनच राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्व घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे काढणार. पुढे अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.