'यासाठी' बापाकडून पोटच्या दोन मुलांची हत्या, गाडीतून मृतदेह नेणाऱ्या आरोपीला 'असं' पकडलं! 

कोल्हापूर
Updated Oct 09, 2019 | 10:06 IST

Satara Children Murder Case: साताऱ्यात एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

father kills two children in the satara police arrested accused
'यासाठी' बापाकडून पोटच्या दोन मुलांची हत्या, गाडीतून मृतदेह नेणाऱ्या आरोपीला 'असं' पकडलं!   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • वडिलांनी पोटच्या दोन मुलांची केली गळा आवळून हत्या
  • हत्येनंतर मृतदेह गाडीतून नेत असताना पोलिसांनी पकडलं
  • आजारपणाला कंटाळून मुलांची हत्या केल्याची आरोपी बापाची कबुली

सातारा: साताऱ्यातील शिरवळमध्ये एका अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या दोन पोटच्या मुलांची गळा आवळून हत्या केल्याची घटना थोड्याच वेळापूर्वी समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरवळमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. सध्या पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वत: बापाने अपरिहार्यतेमुळे दोन्ही मुलांची हत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजतं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शिरवळमध्ये एका व्यक्तीने आपल्या एका एकरा आणि सात वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. पण ही हत्या त्याने नैराश्यातून केली असल्याचं बोललं जात आहे. याबाबत अशी माहिती समोर येत आहे की, आरोपी बाप गेले अनेक दिवस असाध्य आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे आता आपल्या पश्चात आपल्या मुलांचं कसं होणार?, त्यांचा सांभाळ कोण करणार? हे प्रश्न त्याला गेले काही दिवस सतावत होते. या प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या आणि आजारपणाला कंटाळलेल्या बापाने अतिशय टोकाचं पाऊल उचलत आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली. याबाबतचं वृत्त न्यूज १८ लोकमत वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 

हत्येनंतर आपल्या दोन्ही मुलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी बापाने त्यांचे मृतदेह गाडीत भरले. यावेळी हे दोन्ही मृतदेह गावापासून दूर नेण्यासाठी थेट गाडी सातारा महामार्गावर आणली. पण याचवेळी महामार्गावर पोलिसांकडून गाड्यांची तपासणी सुरु होती. तेव्हाच आरोपीच्या गाडीतून पोलिसांना दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधून याबाबतची माहिती त्यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी देखील तात्काळ आरोपीला अटक केली. 

दरम्यान, याप्रकरणी पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून मुलांच्या हत्येमागचं नेमकं काय कारण आहे त्याचाही तपास करत आहेत. पण या संपूर्ण घटनेने शिरवळ गावातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...