पहिल्यांदाच तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक पदाचा मान, या नगरपरिषदेचे सर्वत्र कौतुक

For the first time, a third party has been given the honor of being a recognized corporator : तातोबा हांडे उर्फ देव आई असं नवनिर्वाचित हुपरी नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे. आजही आपण जीवन जगत असताना सतत पाहतो की, तृतीयपंथियांना समाज मोठ्या मनाने स्वीकारत नाही. यांना रूढी परंपरेमुळे तृतीयपंथीयांना समाजातून वगळण्यात येते. परंतु अशावेळी देखील हुपरी नगरपरिषदेने तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान दिला

first time, a third party has been given the honor of being a recognized corporator
पहिल्यांदाच तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक पदाचा मान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्यात आला
  • हुपरी नगरपरिषदेनं पहिल्यांदाच तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान दिला
  • सर्वसाधारण सभेमध्ये तृतीयपंथी तातोबा हांडे उर्फ देव आई यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला

कोल्हापूर : कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्यात आला आहे. हुपरी नगरपरिषदेनं (Hupari Nagar Parishad) पहिल्यांदाच तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान दिला आहे. हुपरी नगरपरिषदेनं दिलेल्या या मनामुळे वंचित वर्गासाठी राजकीय मार्ग आणखी प्रशस्त केला असल्याचं बोललं जात आहे दरम्यान, सदर घटनेने राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्यात आल्याच्या या निर्णयाने कोल्हापूरची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली गेली आहे. राज्याला सामाजिक दिशा आणि नेतृत्व देण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्याने आजवर केल्याचे पहायला मिळते. त्याचबरोबर, सामाजिक सलोख्याचे अनेक पुरोगामी निर्णय देखील कोल्हापूर सतत घेताना देखील आल्याला पहायला मिळतात.

अधिक वाचा ; "अपने बाप का माल है क्या.." मुनगंटीवार अधिकाऱ्यावर संतापले

सर्वसाधारण सभेमध्ये तृतीयपंथी तातोबा हांडे उर्फ देव आई यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला

तातोबा हांडे उर्फ देव आई असं नवनिर्वाचित हुपरी नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे. आजही आपण जीवन जगत असताना सतत पाहतो की, तृतीयपंथियांना समाज मोठ्या मनाने स्वीकारत नाही. यांना रूढी परंपरेमुळे तृतीयपंथीयांना समाजातून वगळण्यात येते. परंतु अशावेळी देखील हुपरी नगरपरिषदेने तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राज्यात तृतीयपंथीयाला पहिल्यांदाच अशा पद्धतीने मान मिळाला आहे. हुपरी नगर परिषदेमध्ये आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये तृतीयपंथी तातोबा हांडे उर्फ देव आई यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा : महिना पूर्ण होण्याआधी रिकामा होतो तुमचा खिसा? करा हे ३ उपाय 

किमान आता, तरी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा 

आम्ही देखील या समाजाचे एक घटक आहोत. तरीदेखील आम्ही तृतीयपंथी असल्याने आपला समाज स्वीकारत आम्हाला नाही.  किमान आता, तरी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा, अशी प्रतिक्रिया तृतीयपंथी संतोष यांनी दिली आहे. इथून पुढे प्रत्येक संस्थांमध्ये अशा पद्धतीने तृतीयपंथी यांना मान दिला, तर त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणणे सोपे होऊन जाईल यात शंका नाही. असंही धोत्रे म्हणाले. तृतीयपंथी हा देखील आपल्या समाजाचा एक घटक आहे. मात्र, अशावेळी हुपरी नगर परिषदेने घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे.

अधिक वाचा ; IND vs WI: विंडीज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी