Gopichand Padlkar on MPSC Exam । सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारली आणि ते पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू लागले आहे. मुख्यमंत्री सक्रीय झाल्याने आता भाजपने त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर (MPSC Student) आमदार गोपीचंद पडळकर आता आक्रमक झाले आहेत. सक्रिय झालेल्या मुख्यमंत्र्यांकडे या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मागणी करत धारेवर धरले आहे.
अधिक वाचा : MPSC Exam News : MPSCची 'ही' मुलाखत पुढे ढकलली
या संदर्भात एक व्हिडिओ त्यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट केला आहे. यात ते म्हणतात, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारली आहे, आणि ते आता सक्रीय झाले, हे ऐकून मला आनंद झाला. म्हणूनच मी आज जवळपास साडे तीन हजार एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधतोय.
संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मध्ये झालेला गोंधळ समोर आला आहे. नुकतेच मा. उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेला बसण्याची परवानगी दिली.
पण उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च न्यायालयाचा दरवाचा ठोठावू शकले नाही. मग त्यांना न्याय मिळणार नाही का? त्यामुळेच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने त्वरीत विचार करावा. मला सरकारला हे सांगायचं की, एमपीएससीने प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे, हे मा. उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे.
अधिक वाचा : एका गुणामुळे हुकली होती संधी, एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
याची दखल घेत राज्य सरकारने एमपीएससीला संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा यात एखाद्याने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर याची सर्वस्वी चे जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला आहे.