ओबीसींवर विश्वास नाही म्हणणाऱ्या आव्हांडावर पडळकरांचा हल्लाबोल 

मंडल आयोग येताना आरक्षणासाठी ओबीसी लढले नाही त्यामुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, असे वक्तव्य करणाऱ्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे.

Gopichan padalkar lashesout Maha minster jitendra Avhad over OBC Remarks
आव्हांडावर पडळकरांचा हल्लाबोल 
थोडं पण कामाचं
  • मंडल आयोग येताना आरक्षणासाठी ओबीसी लढले नाही त्यामुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही,
  • असे वक्तव्य करणाऱ्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे.
  • आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका पडळकरांनी केली आहे. 

सांगली :  मंडल आयोग येताना आरक्षणासाठी ओबीसी लढले नाही त्यामुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, असे वक्तव्य करणाऱ्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे.  आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका पडळकरांनी केली आहे. (Gopichan padalkar lashesout Maha minster jitendra Avhad over OBC Remarks )

जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत.  आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वतला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?  असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे. 

ओबीसीच्या प्रश्नावर अजित पवार यांच्यावर पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, असे अजित पवार यांचे मत आहे. वेळ पडली तर स्थानिक स्वराज  संस्थांवर प्रशासक नेमू असे अजित पवार म्हणाले होते.  यातही महाविकास आघाडीचा डाव आहे. म्हणजे या बहाण्याने  आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच त्यांचा हेतू  असल्याचाही आरोप पडळकर यांनी केला आहे. 

पडळकरांचा अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल 

मागचं दिड वर्ष फक्त केद्राच्या नावाने ओरड केली पण आता यांच्या पायाखालची जमिन सरकलीय  आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहिती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं  काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहे, असेही पडळकर म्हणाले, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी