SANGLI | गांधीजी बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि गोडसेजी म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे-  मंत्री जितेंद्र आव्हाड 

गांधीजी बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्याच वेळी गोडसेजी म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्तेमधील नथुराम गोडसे जागा झाला होता, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

Gunaratna Sadavarte is a foolish person who makes controversial statements about Gandhiji and calls him Godseji - Minister Jitendra Awhad
गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे-  मंत्री जितेंद्र आव्हाड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गांधीजी बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्याच वेळी गोडसेजी म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे.
  • शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्ते मधील नथुराम गोडसे जागा झाला होता
  • मुस्लिम मुलींना पण शिक्षण द्यावे लागेल. मशीद आणि कबरस्तान मधून बाहेर येऊन, कॅम्प्युटर आणि शाळेसाठी निधी मागा.

सांगली :  गांधीजी बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्याच वेळी गोडसेजी म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्ते मधील नथुराम गोडसे जागा झाला होता, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. गुणरत्न सदावर्तेच वक्तव्य ऐकलं की घृणा येतं किळस येतो. देशातील पहिला आतंकवादी असणारा नथुराम गोडसे याला सदावर्ते हा गोडसेजी म्हणतोय अशी टीका ही आव्हाड यांनी केली.  

सर्व मुस्लिम बांधवांना, मराठी लिहिण, वाचणं आणि बोलणं आलंच पाहिजेल, मी उर्दूच्या विरोधात नाही, पण जी मराठी ही शासकीय आणि व्यवहारातील भाषा आहे, त्यामुळे मराठी सर्वाना यायलाच हवी, अस सांगून आव्हाड पुढे म्हणाले, मुस्लीम बांधवांना मुख्य प्रवहात आणण्यासाठी उर्दू ऐवजी इंग्लिश स्कुल मध्ये शिक्षण द्यावे लागेल. 

मुस्लिम मुलींना पण शिक्षण द्यावे लागेल. मशीद आणि कबरस्तान मधून बाहेर येऊन, कॅम्प्युटर आणि शाळेसाठी निधी मागा. सामाजिक मानसिकतेत बदल केला, तरच समाज बदलतो, अस परखड मत ही अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. दुसऱ्याला खड्यात पडणारा, स्वतः खड्यात पडला असून मशिदी बरोबर मंदिरातील पण भोंगे पण बंद झाले आहेत. 

उत्तरप्रदेशात जातो म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना,उत्तर प्रदेश मधून विरोधात झाला आहे, असा टोला ही अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी