Cyber Crime : हॅकरने कोल्हापुरातील बँकेलाच ६८ लाखांना लुटले

कोल्हापूर
Updated Apr 22, 2019 | 15:24 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Cyber Crime : बँकेचे ऑनलाईन पेमेंट सिस्टम हॅक करून बँकेला ६८ लाख रूपयांना लुटल्याचा प्रकार कोल्हापुरात घडला आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईच्या सायबर क्राईम विभागाच्या मदतीने तपास करत आहे.

urban bank current account theft
कोल्हापूर अर्बन बँकेला ऑनलाईन गंडा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • हॅकरने ऑलनलाईन पेमेंट सिस्टमच केली हॅक
  • सुमारे ६८ लाख रुपये ३४ खात्यांवर केले जमा
  • कोल्हापूर पोलिसांना मुंबई सायबर क्राईमची मदत

कोल्हापूर : बँकेची ऑनलाईन पेमेंट सिस्टम हॅक करून बँकेलाच जवळपास ६८ लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. कोल्हापूर अर्बन बँकेच्या ऑल लाईन पेमेंट सिस्टमचे वाभाडे काढत हॅकरनं तीन तासांत ६८ लाख रुपये लुटले आहेत. याबाबत बँकेत आयटी विभागाची जबाबदारी असलेले मुख्याधिकारी बाजीराव खरोशे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, कोल्हापूर पोलिसांचा सायबर क्राईम विरोधी विभाग हॅकर्सचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

कशी झाली चोरी?

कोल्हापूर अर्बन बँकेचे शाहुपुरीतील एचडीएफसी बँकेत करंट अकाऊंट आहे. या खात्यातूनच बँकेचे ऑनलाईन पेमेंटचे सर्व व्यवहार होतात. खात्यावरील दोन क्रमांकावरून आरटीजीएस, एनईएफटीचे सगळे व्यवहार केले जातात. शुक्रवारी बँकेला गुड फ्रायडेची सुटी होती. त्यादिवशी हॅकरने सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत बँकेची डिजिटल पेमेंट सिस्टमच हॅक करून तीन तासांत ६७ लाख ८८ हजार रूपये लुटले. बँकेला सुट्टी असल्यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही. शनिवारी सकाळी बँक पुन्हा सुरू झाल्यानंतर बँकेतील अधिकारी शिल्पा मोहिते आणि मिनाक्षी लुकतुके यांच्या हा प्रकार लक्षात आला. चालू खात्यातून जवळपास ६८ लाख नाहीसे झाल्याचं लक्षात आल्यानंतर बँकेच्या आयटी विभागाची धावाधाव सुरू झाली. हॅकरने बँकेची सिस्टमच हॅककरून गंडा घातल्यानंच लक्षात आल्यानंतर बँकेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हॅकर एकच की टोळी?

बँकेची ऑनलाईन सिस्टम हॅक करण्याचे धाडस करणारे हॅकर सराईत असल्याचं बोललं जात आहे. अर्थात हे कोणा एकट्या हॅकरचे काम असावे, असेही सायबर तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळेच ही टोळी असून, त्यांनी यापूर्वीही इतर ठिकाणी बँका लुटल्या असाव्यात, असा अंदाज आहे. अर्थात ही चोरी त्यांना जगात कोठेही बसून करता येणे शक्य आहे. त्यामुळे हे हॅकर नेमके कुठले? त्यांनी कोठून चोरी केली? पैसे कोठे खर्च केले? याविषयी सस्पेंन्स कायम आहे.

काय केले हॅकरने?

ग्राहकांचे पैसे तात्काळ ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी आयएमपीएस ही यंत्रणा असते. याद्वारे एटीएम आणि इतर सगळे ऑनलाईन व्यवहार होत असतात. ही यंत्रणाचा हॅकरने मोडून काढली. सुटीचा दिवस असल्यानं तो निवडून हॅकरनं बँकेच्या खात्यावर डल्ला मारला. अशा प्रकारे चोरी होत असताना कोणताही अलर्ट देणारी यंत्रणा बँकेकडे अस्तित्वात नसल्यामुळे हॅकर तीन तास ही लूट करत होता. हॅकरने लुटलेली रक्कम जवळपास ३४ खात्यांवर वर्ग केली आहे. त्यामुळे आता या खातेदारांचा शोध घेतला जात आहे. आयएमपीएस क्रमांकावरून या खातेदरांची माहिती मिळवणं शक्य आहे. त्यासाठी सायबर सेल प्रयत्न करत आहे. कोल्हापूर पोलिसांनी मुंबई सायबर पोलिसांची मदत घेतली असून, चोर सापडतील, असा विश्वास व्यक्त पोलिस व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cyber Crime : हॅकरने कोल्हापुरातील बँकेलाच ६८ लाखांना लुटले Description: Cyber Crime : बँकेचे ऑनलाईन पेमेंट सिस्टम हॅक करून बँकेला ६८ लाख रूपयांना लुटल्याचा प्रकार कोल्हापुरात घडला आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईच्या सायबर क्राईम विभागाच्या मदतीने तपास करत आहे.
Loading...
Loading...
Loading...