'सोमय्या यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा ठोकणार', पहा हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद

Somaiya will be charged with Rs 100 crore in criminal defamation suit किरीट सोमय्या यांच्या CA च्या पदवीवर संशय येतोय. माझ्या घरावर आणि कारखान्यावर इनकम टॅक्सची धाड पडली होती,त्यावेळी त्यांना काहीही सापडलं नाही

Somaiya will be charged with Rs 100 crore in criminal defamation suit
'सोमय्या यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहुतेक चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीही तरी चुकीची माहिती दिली असेल – हसन मुश्रीफ
  • हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा, आरोप
  • २७०० पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे - किरीट सोमय्या

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या या आरोपानंतर राज्यात एकच मोठी खळबळ उडाली असल्याचं पाह्यला मिळालं आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या केल्यावर मुश्रीफ यांनी देखील तत्काळ पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी सोमय्या यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. (Hasan Mushrif will be charged with Rs 100 crore in criminal defamation suit on kirit Somaiya)

बहुतेक चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीही तरी चुकीची माहिती दिली असेल – हसन मुश्रीफ

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, बहुतेक चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी सोमय्याना काही तरी चुकीची माहिती दिली असेल. माझ्या पक्षांच्या विरुद्ध आणि आमच्या नेत्यांच्या विरुद्ध बिनबुडाचे खोटे आरोप केले जात आहेत. वास्तविक त्यांनी माहिती घ्यायला हवी होती.  किरीट सोमय्या यांच्या CA च्या पदवीवर संशय येतोय. माझ्या घरावर आणि कारखान्यावर इनकम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळी त्यांना काहीही सापडलं नव्हतं. किरीट सोमय्यांना बिचाऱ्यांना काहीही माहिती नाही. असा टोला हसन मुश्रीफ यानी लगावला आहे.

किरीट सोमय्यांचा यांनी नेमका काय केला दावा?

आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचं नाव जाहीर केलं. ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यानं घोटाळा केला असल्याचा पाढा माध्यमांसमोर वाचणार असल्याचं  सोमय्या यांनी जाहीर केलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केले आहेत. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

२७०० पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे

"ठाकरे सरकारच्या डर्टी ११ संघामध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. मी आणखी एका नेत्याचं नाव यात वाढवत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव मी या संघामध्ये वाढवत आहे. असं देखील किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्याचबरोबर हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. २७०० पानांची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे." असं देखील सोमय्या म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी