पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद

Jawan Rishikesh Jondhale martyred: पाकिस्तानने दिवाळीच्या दिवशी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान ऋषिकेश जोंधळे हे शहीद झाले आहेत. 

Jawan rishikesh ramchandra jondhale martyred
जवान ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण  |  फोटो सौजन्य: Twitter

कोल्हापूर : पाकिस्तानने ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचं उल्लंघन (ceasefire violation) करत भ्याड हल्ला केला. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्यानेही (Indian Army) चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे (Jawan Rishikesh Jondhale martyred) यांनाही वीरमरण आले आहे. ऋषिकेश रामचंद्र जोंधळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असलेल्या बहिरेवाडी गावचे निवासी होते. ते अवघ्या २० वर्षांचे होते.

ऋषिकेश जोंधळे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऋषिकेश जोंधळे यांना एक लहान बहीण आहे. ऐन दिवाळीत ऋषिकेश यांच्या निधानाचं वृत्त आलं आणि कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रावर एकच शोककळा पसरली.

ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजकीय नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं, "जम्मू काश्मीर येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर येथील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांना वीरमरण आले. ऋषिकेश यांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम. अतिशय कमी वयात त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले." 

भारताचे चोख प्रत्युत्तर 

पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भ्याड हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासोबतच सामान्य नागरिकांवरही गोळीबार केला. या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने सुद्धा चोख प्रत्तुत्तर दिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बंकर, तळ उद्धवस्त केली आहेत. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईत जवळपास ७ ते ८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. भारतीय सैन्याच्या या कारवाईचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी