Kolhapur Crime : सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पर्यटक आणि भाविकांनी फुलून गेले आहे. दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा, त्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई रथोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली. या गर्दीचा फायदा घेत चोरांनी उच्छाद घातला. जोतिबाच्या यात्रेपासून ते अंबाबाई रथोत्सवात चोरीच्या अनेक घटना घडल्या. कोल्हापुरात दोन दिवस पार पडलेल्या अंबाबाई रथोत्सवातही तीन महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार घडला. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर पाणी फेरले. दरम्यान, जोतिबा डोंगरावर 83 चोरट्यांना पकडण्यात पोलिासंना यश आले.
अधिक वाचा : दहीच्या वादानंतर आता अमूलविरुध्द नंदिनीचं राजकारण तापलं
चैत्र यात्रेनंतर दुसऱ्याच दिवशी अंबाबाईचा रथोत्सव होत असतो. दोन दिवस झालेल्या रथोत्सवात मोठा जनसागर आला लोटला होता. याच गर्दीत चोरट्यांनी हात साफ करताना तब्बल 2 लाख 15 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तीन महिलांच्या दागिने चोरीला गेल्याची नोंद जुना राजवाडा पोलिसांकडे झाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून दीड तोळ्याची सोनसाखळी लांबवण्यात आली. अन्य एका महिलेची सोन्याची माळ, तसेच तिसऱ्या एका महिलेची सुद्धा सोनसाखळी लंपास करण्यात आली.
अधिक वाचा : उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने होतील या समस्या
चैत्र यात्रा लाखोंची गर्दी होऊनही शांततेत पार पडली. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी भाविकांचा खिसा रिकामा केला. याच गर्दीतून पोलिसांनी 83 चोरट्यांना ताब्यात घेत अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई करण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या 83 पैकी 47 संशयितांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत व 32 संशयितांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.