KDCC Bank Election Final Result : कोल्हापूर जिल्हा बँक मतमोजणी, आमदार प्रकाश आवाडे पराभूत, सेनेला दुसरं यश

KDCC Bank Election result update । कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( KDCC Bank Election Result) 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आलेला आहे.

kdcc bank election live result Update kolhapur district cooperative bank election counting live updates
कोल्हापूर जिल्हा बँक मतमोजणी, आमदार प्रकाश आवाडे पराभूत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( KDCC Bank Election Result) 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे.
  • कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आलेला आहे.
  • आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे.

KDCC Bank Election result full  । कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा (Kolhapur District Central Co-operative Bank Election 2022) निकाल लागला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (ncp), काँग्रेस (congress) आणि शिवसेनेतच (shivsena) काटें की टक्कर  पाहण्यास मिळाली. तर भाजपने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला मदत केली. पण, राष्ट्रवादीने गड राखला असला तरी शिवसेना किंगमेकर ठरली आहे.  सत्ताधारी गटातील 8 उमेदवार विजयी झाले आहे तर विरोधी गटातील 6 उमेदवारांना विजयाचा माळ गळ्यात पाडण्यात यश आले आहे. 

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे.  शिवसेनेनं टक्कर दिल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली. 15 जागांपैकी सत्ताधारी गटाला 8 जागा जिंकता आल्या आहेत. तर विरोधी गटाने आतापर्यंत 6 जागांवर मुसंडी मारली आहे.

जिल्हा बँक निवडणूक निवडून आलेले उमेदवार असे

सत्ताधारी आघाडी 
राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने
.................
विरोधी आघाडी 
संजय मंडलिक,बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर
.................
अपक्ष
रणवीरसिंह गायकवाड
...............
याआधी बिनविरोध झालेले सत्ताधारी
हसन मुश्रीफ, सतेज पाटील,पी.एन.पाटील, राजेश पाटील,ए. वाय पाटील,अमल महाडिक

 

Also Read : म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी पाहा लाइव्ह सोडत 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( KDCC Bank Election Result) 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे.यापूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आला. यामध्ये सत्ताधारी गटान खातं उघडलं आहे. आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे.  तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे देखील विजयी झाले आहेत. त्यांनी गणपत पाटील यांचा पराभव केला. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

पतसंस्था गटातून अर्जुन अबिटकरांनी उधळला गुलाल 

पतसंस्था गटामध्ये सत्ताधारी गटाला जोरदार दणका बसला आहे. शिवसेना आमदार प्रकाश अबिटकर यांचे बंधू अर्जुन अबिटकर यांनी आमदार प्रकाश आवडे यांना आस्मान दाखवले आहे. 

शेती संस्था व व्यक्ती सभासद गटात भैय्या माने विजयी

शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून सत्ताधारी गटाचे भैया माने यांनी विजयक्षी खेचून आणला आहे.  त्यांनी विरोधी आघाडीच्या क्रांतिसिंह पाटील यांना धोबीपछाड दिली आहे.   भैय्या माने यांना 2266 तर पाटील यांनी 1655 मते मिळाली. 611 मताधिक्य घेत भैय्या माने विजयी झाले.

आरोग्य राज्यमंत्री विजयी

शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयीश्री संपादन केला आहे.  गणपतराव पाटील यांचा  यड्रावकर यांनी पराभव केला आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना 98 मते तर गणपतराव पाटील यांना 51 मते मिळाली. शिरोळ तालुक्यात चुरशीच्या लढतीत अखेर यड्रावकर यांनी  गुलाल उधळला आहे तर माजी खासदार राजू शेट्टी यांचा राइट कार्यक्रम झाल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यात आहे. 

Also Read - 'पुष्पा द राइज' ची उदयनराजेंमध्येही क्रेझ

बिनविरोध ६ उमेदवार 

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 15 जागांसाठी मतदान झाले आहे. तर, 6 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शिवसेनेच्या पॅनेलनं खातं उघडलं

कोल्हापूर प्रक्रिया गटातून राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे प्रमुख खासदार संजय मंडलिक विजयी झाले आहेत. याद्वारे विरोधी आघाडीने देखील निवडणूक निकालात विजयी सुरूवात केली आहे. 

आजरा सेवा संस्था गटात धक्कादायक निकाल, विद्यमान संचालक पराभूत

आजरा सेवा संस्था गटात धक्कादायक निकाल लागल्याचे समोर आलं आहे. आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना त्यांनी पराभवाची चव चाखवली आहे. सुधीर देसाई यांना 57 मते तर अशोक चराटी यांना 48 मते प्राप्त झाली आहेत.

पन्हाळा तालुक्यातून विनय कोरेंचा विजय 

पन्हाळा तालुका सेवा संस्था गटातून सत्ताधारी आघाडीचे आमदार विनय कोरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.  विनय कोरे यांनी शिवसेनेला धक्का देत त्यांचे उमेदवार विजयसिंह पाटील यांना धूळ चारली आहे. 

आघाडीतील पक्षांची कोल्हापूरमध्ये कुस्ती

राज्यात सत्तेत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ( KDCC Bank Election) निमित्ताने एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे होते. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस, (Cognress) राष्ट्रवादी, (NCP) भाजप (BJP) ताराराणी आघाडीच्यावतीनं पॅनेल तयार करण्यात आले. तर, शिवसेनेनं (Shivsena) देखील शेकापच्या साथीनं पॅनेल तयार केले होतं. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यांच्यात ही रंगतदार निवडणूक झाली. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेले मल्ल कोल्हापुरात एकमेंकाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरातून येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी